Pune Porshe Accident News: पुण्यातील बिल्डरच्या मुलाने बेदरकारपणे गाडी चालवून 2 जणांचे जीव घेतल्याच्या घटनेमुळे पुण्यासह राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. शिवाय दोन जणांचे जीव घेणाऱ्या वेदांत अगरवाल (Vedanta Aggarwal) याला अवघ्या 15 तासात जामीन मिळाल्याने या संतापात आणखी भर पडली आहे. या प्रकरणामुळे सर्वच स्तरातून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश त्यांनी पुणे पोलिस (Pune Police) आयुक्तांना दिले आहेत.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करुन पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळाला असला तरी त्याच्याविरुद्ध अपील दाखल करण्याच्याही सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, या प्रकरणात आरोपीला कोणतीही विशेष ट्रिटमेंट दिली असल्यास, त्यावेळचे पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही (CCTV) तपासून ते खरे असेल तर तत्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेशही फडणवीसांनी दिले आहेत. त्यामुळे आता खुद्द गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतल्यामुळे लवकरच मृतांना योग्य तो न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुण्यात (Pune) एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारूच्या नशेत बेदरकारपणे आलिशान पोर्शे कार चालवत मध्यरात्री दुचाकीवरील दोघांना उडवल्याची घटना घडली. कल्याणीनगर (Kalyaninagar) येथे घडलेल्या या घटनेमध्ये दुचाकीवरील निष्पाप तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांना चिरडणारा अल्पवयीन वेदांत अगरवालला अवघ्या 15 तासात जामीन मिळाल्याने पुण्यासह राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका होऊ लागली होती. त्यामुळे अखेर या प्रकरणाची दखल आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.
(Edited By Jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.