shivani agarwal sarkarnama
पुणे

Pune Porsche Accident : वडील, आजोबानंतर आता अल्पवयीन मुलाच्या आईला पोलिसांकडून अटक, कारण काय?

Porsche Hit And Run Case : अल्पवयीन मुलाच्या आईला गुन्हे शाखेनं पहाटे अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

Akshay Sabale

Pune Accident News in Marathi, 1 May : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलगा बालसुधारगृहात तर वडील विशाल अगरवाल ( Vishal Agarwal ), आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल ( Surendrakumar Agarwal ) सध्या कोठडीत आहेत. यातच आता अल्पवयीन मुलाच्या आईला पुणे गुन्हे शाखेनं अटक केली आहे. रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात ( Pune Accident Porsche ) अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं होतं. त्याच्या जागी आई शिवानी अगरवाल ( Shivani Agarwal ) यांचं रक्त दिल्याचं चर्चा सुरू होती. त्याच प्रकरणातील चौकशीसाठी गुन्हे शाखेनं शिवानी अगरवाल यांना हजर राहण्यासाठी समन्स बजावलं होतं.

अखेर शनिवारी पहाटे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं शिवानी अगरवाल यांना ताब्यात घेतलं आहे. शिवानी अगरवाल यांना पोलिस आयुक्त कार्यालयात आणलं जाणार आहे. रक्त नमुने आदलाबदली करण्याच्या प्रकरणात शिवानी अगरवाल यांचा सहभाग आहे का? याची चौकशी करण्यात येणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'धूम' स्टाइनलं कार चालवत दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचा नमुना बदलल्याप्रकरणी पोलिसांनी 'ससून'चे न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. अजय तावरे ( Ajay Taware ), डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शिपाई अजय घटकांबळेला अटक केली आली आहे. या तिघांची रवानगी सध्या कोठडीत करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT