Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणी क्राईम ब्रँचचे मोठे पाऊल; आता अल्पवयीन आरोपीचीच चौकशी

Pune Crime Branch : अपघातातील आरोपी मुलाच्या दोन मित्रांची चौकशी झालेली आहे. आता आरोपीचीच चौकशी होणार असल्याचे पोलिसांच्या हाती काय लागणार, याकडे लक्ष आहे.
Porsche Car Accident Case
Porsche Car Accident CaseSarkarnama
Published on
Updated on

कल्याणीनगर येथे पोर्शे कारने अपघात करून दोन युवकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन असलेल्या पण मुख्य आरोपीची उद्या शनिवारी (ता. १ जून) चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी पुणे गुन्हे शाखेला थेट बाल न्याय हक्क मंडळाने परवानगी दिली आहे. या चौकशीत अपघातप्रकरणी आणखी काही खळबळजनक खुलासे होण्याची शक्यता आहे.

पुण्यातील अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलाला बाल सुधार गृहात ठेवले आहे. त्याची आतापर्यंत कुठल्याही प्रकारची चौकशी करण्यात आलेली नाही. मात्र अपघात प्रकरणाच्या अधित तापासाठी त्याची चौकशीसाठी गुन्हे शाखेने बाल न्याय हक्क मंडळाकडे परवानगी मागितली होती. मंडळाने त्याची दोन तास चौकशीसाठी परवानगी दिल्याची माहिती आहे.

दरम्यान, ही चौकशी होताना अल्पवयीन आरोपीचे पालकांची उपस्थित अपेक्षित आहे. मात्र त्याचे वडील पोलिस कोठडीत तर आई अज्ञातवासात आहे. तर त्यांच्या आजोबाही तुरुंगात आहेत. त्यामुळे त्याची चौकशी बाल न्याय हक्क मंडळाचा एक सदस्य उपस्थित असणार आहे. तर या चौकशीसाठी आरोपी मुलाच्या भावालाही नोटीस देण्यात आलेली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Porsche Car Accident Case
Ajit Pawar Vs Devendra Fadnavis : महायुतीत होणार बंड? बोरनारेंनी घेतले दोन अर्ज; भाजपच्या भूमिकेकडे लक्ष...

राजकीय हस्तक्षेप झाल्याने या अपघात प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. पोलिसांनी आरोपीला व्हिआयपी ट्रटमेंट देणे, वैद्यकीय तपासणीसाठी आठ तास उशिरा नेणे, त्यानंतर त्याच्या तपासणीसाठी दिलेल्या रक्ताचे नमूने बदलून रिपोर्टमध्ये फेरफार केल्याने हे प्रकरण देशभर चर्चेत आहे. या प्रकरणी गंभीर स्वरुपात राजकीय आरोपही होत आहेत. दरम्यान, अपघातातील आरोपी मुलाच्या दोन मित्रांची चौकशी झालेली आहे. आता आरोपीचीच चौकशी होणार असल्याचे पोलिसांच्या हाती काय लागणार, याकडे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Porsche Car Accident Case
Amol Kolhe vs. Shivajirao Adhlrao Patil : शिरूरच्या 'किल्ल्या'साठी कोल्हे-आढळराव पाच वाजेपर्यंत झुंजणार !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com