ravindra dhangekar sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar : धंगेकरांचा पोलिस स्टेशनमधून ग्राउंड रिपोर्ट, पोलिसांच्या 'कारभारावर'ठेवलं बोट; थेट पुरावाच दाखवला

Ravindra Dhanegkar on Pune Police : कल्याणीनगर प्रकरण दडपले जात असल्याचा आरोप धंगेकरांनी केला होता. यानंतर आता पोलिसाचा पबमधील फोटो धंगेकरांनी दाखवला आहे.

Akshay Sabale

Pune Hit And Run Case, 24 May : पुण्यात 'धूम' स्टाइल बेदरकारपणे कार चालवून एका अल्पवयीन युवकानं दोन तरुणांना चिरडलं. हे प्रकरण पोलिसांकडून दडपले जात असल्याचा दावा आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. आता रवींद्र धंगेकर यांनी पब्स आणि हॉटेलमधून पोलिस हफ्ते गोळा करतात, असा गंभीर आरोप करत थेट कर्मचाऱ्याचा पबमधील फोटोच दाखवला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

"मुंढवा पोलिस ठाण्यातील 3 कर्मचारी हॉटेल आणि पब्समधून हफ्ते गोळा करतात. या कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावं. अन्यथा 48 तासांत अन्य व्हिडीओ देखील ट्विट करण्यात येतील," असा इशारा धंगेकरांनी ( Ravindra Dhangekar ) दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'एक्स' अकाउंटवर ट्विट करत धंगेकर म्हणाले, "राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो , कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार ( Amitesh Kumar ) यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर कारवाई करणार? असो, आजपासून मी तुम्हाला दररोज एका पोलिस स्टेशनवर सुरू असलेल्या गैर-कारभाराची कथा पाठवणार आहे."

"दिवस 1 ला - मुंढवा पोलिस स्टेशन.... हे पोलिस स्टेशन अवघे 3 कर्मचारी चालवतात. त्यापैकी निलेश पालवे, काळे हे कॉन्स्टेबल सर्व पब्स, हॉटेल येथून हप्ते गोळा करण्याचे काम करतात. सोबत एक फोटो जोडत आहे, ज्यात हे वसुली कॉन्स्टेबल वॉटर्स नावाच्या पबमध्ये पार्टी करताना दिसून येत आहेत. आम्हा पुणेकरांच्या वतीने आपणास विनंती आहे की, पुणे बिघडविणाऱ्या या पोलिस कॉन्स्टेबलची तातडीने चौकशी करत यांना निलंबित करा, अन्यथा 48 तासात यांचे इतर व्हिडिओ देखील असेच ट्विट करण्यात येतील. पुन्हा भेटुयात नव्या पोलिस स्टेशनचा ग्राउंड रिपोर्ट घेऊन. जय हिंद ,जय पुणेकर!," असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT