BJP leader Pravin Darekar addressing media in Pune while criticizing Rahul Gandhi and Abu Azmi over recent political remarks.  sarkarnama
पुणे

Pravin Darekar on Rahul Gandhi - ''राहुल गांधी हे पार्ट टाइम राजकारणी; आरोप करायला फार..''; दरेकरांची बोचरी टीका!

Pravin Darekar on Abu Azmi - ''अबू आझमी यांचं थोबाड फोडलं पाहिजे.आम्ही वारकरी लोक आहोत, आम्ही संस्कृती मानतो आम्ही नमाजाच्या विरोधत कधीच बोललो नाही.'' असंही दरेकर म्हणाले आहेत.

Sudesh Mitkar

BJP’s Pravin Darekar Slams Rahul Gandhi and Abu Azmi : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्याप्रमाणात घोटाळा झाल्या असल्याचा आरोप सातत्याने काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्याकडून करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघांमध्ये वाढलेल्या टक्केवारीवरून निशाणा साधला आहे.

मतदानाच्या टक्केवारीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या आरोपानंतर आता भाजपकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. या मुद्द्यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात केवळ ५ महिन्यांत मतदार यादीत ८ टक्के मतांची वाढ झाली असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच मतदान केंद्रांवर २० टक्के ते ५० टक्के पर्यंत मतांची वाढ झाली असल्याचं सांगितलं आहे. बूथ लेव्हल अधिकारी यांनीही अनोळखी लोकांनी मतदान केल्याचे सांगितल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

याबाबत पुण्यातील एका पत्रकार परिषदेत दरेकर म्हणाले, ''आरोप करण्यासाठी फार काही अक्कल लागत नाही. राहुल गांधी यांना अलीकडच्या काळात देशाच्या राजकारणामध्ये सिरियसली घेतलं जात नाही. कारण ते सिरियसली राजकारण न करता पार्ट टाइम राजकारण करतात. ते परदेशात जातात कधीतरी दोन दिवस देशांमध्ये येतात आणि अशा पद्धतीचे वक्तव्य करतात.'' अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

दरेकर पुढे म्हणाले, ''खळबळजनक वक्तव्य करून राजकारण करण्याचा नवीन प्रकार त्यांनी सुरू केला आहे. मात्र देशांमध्ये निवडणूक आयोग नावाची यंत्रणा आहे. निवडणुकीबाबत काही शंका असतील तर त्या आपण निवडणूक आयोगाला विचारतो आणि निवडणूक आयोगाने त्यांना तपशीलवार उत्तर देखील दिले आहे. तरीदेखील संशय निर्माण करून देवेंद्र फडणवीस ज्या गतीने महाराष्ट्राला पुढे नेत आहेत त्यांना ब्रेक लावण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे सर्व सुरू आहे.''

याचबरोबर, ''अबू आझमी यांनी वारी बाबत केलेल्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले, अबू आझमी यांचं थोबाड फोडलं पाहिजे. आम्ही वारकरी लोक आहोत.आम्ही संस्कृती मानतो आम्ही नमाजाच्या विरोधत कधीच बोललो नाही. नमाज रोज होते वारकऱ्यांची दिंडी रोज नसते अबू आझमीने समजून घ्यावे.'' असं म्हणत मीडियामध्ये पब्लिसिटी करत राजकीय पोळी भाजण्यासाठी असं ते बोलत आहे. अशी टीकाही दरेकर यांनी केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT