District Collector Jitendra Dudi Sarkarnama
पुणे

Pune Rain Update : पुणेकरांनो जिल्हाधिकारी काय म्हणताहेत लक्ष द्या! शहरातील परिस्थिती नियंत्रणात पण...

Rain News Pune: पुण्यात कालपासून संततधार पाऊस सुरु असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत.

Amit Ujagare

Pune Rain Update : पुण्यात कालपासून संततधार पाऊस सुरु असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. याचा परिणाम वाहतूकीवर झाला असून त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. आद्यापही पावसाची संततधार सुरुच असून धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन मोठा विसर्गही सुरु करण्यात आला आहे.

यापार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुणेकर नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसंच शहरासह जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती कशी आहे? याची माहिती दिली आहे. शहरात असाच पाऊस सुरु राहिला तर पूरस्थिती निर्माण होऊ शकते असा इशाराही त्यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी डुडी नेमकं काय म्हणाले?

गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर भागात ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती नियंत्रणात आहे. जर पाऊस असाच राहिला तर शहरात काही ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते. जिल्ह्यातील सगळ्या यंत्रणांशी मी संपर्कात आहे. जर धरण साखळी क्षेत्रात असाच पाऊस पडत राहिला तर धरणातून विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून शहरी भागात थोडसं लक्ष देण्याची गरज आहे.ज्या ठिकाणी पूर नियंत्रण रेषा आहे, गरज पडली तर तिथल्या लोकांना स्थलांतरित करायचं असेल तर त्यावेळी त्यांना तशा सूचना देण्यात येतील, असं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी म्हटलं आहे.

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग

दरम्यान, आज मंगळवारी खडकवासला धरणाच्या सांडव्यावरुन मुठा नदी पात्रात सुरु असणारा 11,878 क्युसेक पाणीसाठा वाढवून तो दुपारी २ वाजता 15,442 क्युसेक करण्यात आला आहे. यामध्ये आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो. याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी, असं पुणे महापालिकेनं कळवलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT