Raj Thackeray : मनसेचा राजकीय दर्जा रद्द करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली, याचिकाकर्त्याला फटकारलं सुद्धा..

Raj Thackeray MNS : राज ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करा तसेच मनसेची मान्यता रद्द करा अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. मुंबईतील एका वकिलाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठी विरुद्ध अमराठी असा वाद सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठी भाषा न बोलल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीयांना मारहाण केल्याचे सोशल मीडियातून समोर आले होते. त्यानंतर मराठीच्या मुद्दयावरुन दोन्ही ठाकरे बंधूनी मेळावा घेतला होता. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मनसेचा राजकीय दर्जा रद्द करा अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती.

राज ठाकरे यांच्या विरोधातील या याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. अॅड. घनश्याम उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली होती. राज ठाकरे अमराठी लोकांविरुद्ध द्वेष पसरवत असल्याचा या याचिकेत आरोप करण्यात आला होता. परंतु राज ठाकरेंविरोधातील दाखल केलेली याचिका केवळ प्रचार आणि प्रसिद्धीसाठी असल्याचा ठपका सुप्रीम कोर्टाने ठेवला आहे.

याशिवाय सुप्रीम कोर्टाने काही प्रश्न याचिका कर्त्याला उपस्थित केले आहेत. ज्यांनी याचिका दाखल केली ते याचिकाकर्ते हायकोर्टात का गेले नाहीत? उच्च न्यायालय सुट्टीवर आहे का? असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला आहे. याचिकाकर्त्याला याचिका मागे घेण्याचे सूचवत उच्च न्यायालयात जाण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. दरम्यान याचिकाकर्त्यांनी याचिका सर्वोच्च न्यायालयातून काढून घेतल्याची माहिती समजते आहे.

Raj Thackeray
Girish Mahajan Politics : खडसेंविरोधात आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी हद्द ओलांडली ; गिरीश महाजन म्हणाले, हे योग्य नाही..

आपल्या राजकीय फायद्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हिंदी भाषेवरुन द्वेष पसरवत असून समाजात तेढ निर्माण करत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी याचिकाकर्ते उपाध्याय यांनी केली होती. त्यांनी या याचिकेत ५ जुलै रोजी शिवसेना(उबाठा) व मनसे यांनी मिळून मुंबईत काढलेल्या विजयी मेळाव्याचा उल्लेख केला होता. राज ठाकरेंच्या या मेळाव्यातील भाषणावर याचिकार्त्यांनी आक्षेप नोंदवला होता.

Raj Thackeray
BJP MLA : भाजप आमदाराला ड्रायव्हिंगची भलतीच हौस, यापूर्वी घाटात ट्रक आणि आत्ता एसटी बसही चालवली

मराठी न बोलणाऱ्यांच्या कानाखाली वाजवा हा राज ठाकरेंनी दिलेला सल्ला म्हणजे अशा व्यक्तींवर थेट हल्ला करण्याचं समर्थन केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. हिंदी भाषेचा मुद्दा येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडून मुद्दाम उचलून धरला जात आहे. देशाच्या एकात्मतेस धोका निर्माण करणाऱ्या पक्षांच्या कृतींवर लक्ष ठेवण्यासाठी संयुक्त धोरण करावे व असे पक्ष दोषी आढळल्यास त्यांची मान्यता रद्द करावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. परंतु सुप्रीम कोर्टाने ही याचिकाच फेटाळली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com