Amol Kolhe vs Dhirendra Shastri Sarkarnama
पुणे

Amol Kolhe vs Dhirendra Shastri : ‘उत्तर भारत झुकला, सह्याद्री उभा राहिला’; अमोल कोल्हेंचा धीरेंद्र शास्त्रींना झणझणीत टोला!

Amol Kolhe counters Dhirendra Shastri, reminds of North India surrender during Mughal invasions amid Shivaji Maharaj remark controversy : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर विधान करणारे बागेश्वर सरकार धाम धीरेंद्र शास्त्री यांना खासदार अमोल कोल्हे यांनी चांगलचं सुनावलं आहे.

Pradeep Pendhare

Shivaji Maharaj controversy : बागेश्वर सरकार धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानांवर, शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी थेट उत्तर भारताच्या इतिहास सांगून जोरदार प्रहार केला आहे.

खासदार कोल्हे यांच्या या बोचऱ्या टीकेमुळे उत्तर विरुद्ध महाराष्ट्र, असा वादाला अधिकच धार येण्याची चिन्हं आहेत.

खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, "उत्तर भारताने मुघल आक्रमणासमोर पळी पंचपात्र गुंडाळून मान झुकवली असताना, मनगटाच्या जोरावर तलवारीच्या पातानं, सह्याद्रीच्या कातलावर इतिहास कोरणाऱ्या महाराष्ट्राला, त्याच उत्तरेतून येऊन कुणी चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवण्याची गरज नाही."

'छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे केवळ दैवतच नाही, श्वास, नसात, रोमा-रोमात आहेत. ती आमची अस्मिता, स्वाभिमान आणि ओळख आहे. काल, आज आणि उद्याही!' असा घणाघात खासदार कोल्हे यांनी केला.

बागेश्वर सरकार धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नागपूरमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे.

धीरेंद्र शास्त्री यांनी असा दावा केला की, "सततची युद्धे आणि संघर्ष करून छत्रपती शिवाजी महाराज थकले होते. त्यानंतर त्यांनी आपला मुकुट समर्थ रामदास स्वामींच्या पायाशी ठेवला आणि 'आता मी थकलो आहे, हे राज्य तुम्ही सांभाळा' असे म्हटले होते".

धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या विधानावर, महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक इतिहासकार आणि नेत्यांनी हे विधान इतिहासाला धरून नसल्याचे सांगून, महाराजांचा अवमान झाल्याचा आरोप केला. धीरेंद्र शास्त्रींनी केलेल्या चुकीच्या विधानावर त्यांना महाराष्ट्रात येण्याच्या बंदीची मागणी लावून धरण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT