Tipu Sultan photo controversy : ‘टिपू’वरून वादाचा वणवा; सपकाळांच्या विधानानं 'पेट्रोल'चं काम केलं, फडणवीसांसह अख्खी भाजप तुटून पडली

Tipu Sultan Photo Row in Malegaon; BJP Slams Congress : मालेगावात समाजवादी पक्षाच्या उपमहापौरांची बाजू घेताना, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोरदार हल्ला चढवला आहे.
Tipu Sultan photo controversy
Tipu Sultan photo controversySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra political controversy : मालेगाव महापालिकेतील सत्ताधारी समाजवादी पक्षाचे उपमहापौर शाने-ए-हिंद यांनी दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यावरून महाराष्ट्रातील राजकारणात आता भडका उडायला सुरवात झाली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांचे ब्रिटिशांविरोधातील लढा असल्याचे सांगून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष म्हटले पाहिजे, असे विधान केलं. या विधानानं आता पेट्रोलचं काम केलं असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अख्खी भाजप काँग्रेस अन् हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर तुटून पडली आहे.

मालेगाव महापालिकेतील समाजवादी पक्षाच्या (Samajwadi Party) शाने-ए-हिंद यांनी त्यांच्या उपमहापौरपदाच्या दालनात टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावले. समाज माध्यमांवर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेने आयुक्तांकडे धाव घेत, हा फोटो काढण्याची आणि कारवाई करण्याची मागणी केली. तसंच निषेध देखील नोंदवला.

उपमहापौर शाने-ए-हिंद यांनी आज माध्यमांसमोर येत, 'दालनात कोणता फोटो लावावा हा आमचा अधिकार आहे. कार्यकर्त्यांनी फोटो लावला, त्यात काही गैर नाही. आम्ही समाजवादी विचाराचे लोक आहोत, आमच्या विचाराचे महापुरुषांचे लावणार. टिपू सुलतान फोटोला विरोध केल्यानंतरही टिपू सुलतानचा फोटो माझ्या दालनात होता. मात्र दालनाची दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे हा फोटो काढला आहे. दुरुस्तीनंतर हा फोटो पुन्हा दालनात लावणार आहे,' असे स्पष्ट सांगितले.

Tipu Sultan photo controversy
Dhananjay Munde : देवाभाऊंसमोर मागण्यांचा पाऊस; ‘जास्त बोलू नका’चा निरोप, धनूभाऊंचं ‘कामधेनू’ विधान चर्चेत!

तसंच 'इतर महापुरुषांचे फोटो लावण्याची जबाबदारी ही महापालिका प्रशासनाची आहे. दालनात प्रथम संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावणे आवश्यक होते. महापुरुषांचे फोटो का लावले नाही, याचा जाब महापालिका प्रशासनाला विचारा,' असाही सल्ला विरोध करणाऱ्यांना शाने-ए-हिंद यांनी दिला.

Tipu Sultan photo controversy
National Health Mission Maharashtra : आपत्कालीन सेवेसाठी 100 कोटी; महाराष्ट्रभर धावणार सुसज्ज रुग्णवाहिका!

मालेगाव महापालिकेतील टिपू सुलतानाच्या फोटोमुळे आता राज्यातील राजकारणात भडका उडायला सुरूवात झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी, या प्रकारावर प्रतिक्रिया देताना, 'छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य ज्यापद्धतीचं आहे, त्यांचाच आदर्श घेऊन टिपू सुलताना यांनी ब्रिटिशांविरोधात लढा दिलेला आहे. या अर्थाने टिपू सुलताना शौर्य गाजवणारे योद्धे होऊन गेले. त्यांनी कधीही विषारी विचारांना जवळ केलं नाही. शौर्याचं रक्षण म्हणून, टिपू सुलतान यांना शिवरायांच्या समकक्ष म्हटलं पाहिजे.'

हर्षवर्धन सपकाळ यांच्या या प्रतिक्रियेवर भाजपने अर्थ काढत आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपकाळ यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना, 'हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्याप्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलताना यांच्याशी केली आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांना लाज वाटली पाहिजे. एकीकडे स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवराय अन् दुसरीकडे हजारो हिंदुंची कत्तल करणारा टिपू सुलतान, यांना एकसमान आदर देण्याच्या गोष्टी काँग्रेस करत असेल, तर महाराष्ट्र हे सहन करणार नाही,' असा इशारा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com