Crime News  Sarkarnama
पुणे

Pune Crime News : 2 चिमुकल्या बहि‍णींच्या हत्येने पुणे हादरलं, घराबाहेर खेळत असताना अचानक गायब झाल्या अन्...

Pune Rajgurunagar girls murder case : मागील अनेक दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यातून अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेवर संशय व्यक्त केला जात आहे. अशातच आता राजगुरूनगरमध्ये 2 मुलींची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

Jagdish Patil

Pune Rajgurunagar girls murder case : मागील अनेक दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यातून अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे पुण्यात (Pune) कायदा आणि सुव्यवस्थेवर संशय व्यक्त केला जात आहे. अशातच आता राजगुरूनगरमध्ये 2 मुलींची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

या घटनेमुळे आता नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही मुली घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर मुली दिसेनात म्हणून पालकांनी त्यांना शोधायला सुरूवात केली.

मात्र, खूप शोधाशोध करूनही या मुली सापडल्या नाहीत. अखेर रात्री उशीरा शहराबाहेर एका इमारतीच्या बाजूला या मुलींचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले. या घटनेमुळे राजगुरूनगरमध्ये (Rajgurunagar) एकच खळबळ उडाली आहे.

हत्या झालेल्या मुलींची नावे दुर्वा आणि कार्तिकी मकवाने अशी आहेत. तर या दोन चिमुरड्या मुलींची ह्या का केली? तसंच त्यांच्यासोबत लैंगिक अत्याचार करण्यात आला का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून याबाबतचा तपास आता पोलिस (Police) करत आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी घराजवळ खेळत असलेल्या दुर्वा आणि कार्तिकी दोन्ही बहिणी अचानक बेपत्ता झाल्या. मुली दिसेनात म्हणून पालकांनी आणि शेजाऱ्यांनी त्यांचा शोध घ्यायला सुरूवात केली.

दुपारपासून शोधाशोध केल्यानंतर रात्री राजगुरुनगर शहराजवळ असलेल्या एका इमारती जवळ या दोन्ही बहिणींचे मृतदेह ड्रममध्ये छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले. दरम्यान, राजगुरुनगर पोलिसांनी दोन्ही मुलीचे मृतदेह शवच्छेदनासाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT