Student Protest News Sarkarnama
पुणे

Student Protest News : पुण्यात प्रमुख चौकांत विद्यार्थी आंदोलनांना बंदी; पूर्वपरवानगीशिवाय आंदोलन केल्यास थेट गुन्हा दाखल होणार!

Permission required for student protests in Pune : पुण्यातील प्रमुख चौकांमध्ये विद्यार्थी आंदोलनांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पूर्वपरवानगीशिवाय आंदोलन केल्यास संबंधितांवर थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सततच्या आंदोलनांमुळे पुण्यात कायदा व सुव्यवस्थेचा आणि वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आता अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे.

शहरातील एफसी रोड, जेएम रोड, बालगंधर्व चौक, अलका चौक, खंडोजीबाबा चौक, टिळक चौक तसेच नदीपात्र या प्रमुख ठिकाणी आणि रस्त्यांवर पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही प्रकारच्या आंदोलनास, धरणे, मोर्चा किंवा रास्ता रोको करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या प्रतिनिधींसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय स्पष्ट केला आहे. गेल्या काही वर्षांत एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या विविध मागण्यांसाठी उमेदवारांनी अनेकदा अचानक आंदोलने करून शहरातील प्रमुख रस्ते रोखले होते. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होऊन सर्वसामान्य नागरिकांना, रुग्णवाहिकांना आणि नोकरदारांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर, शहरात 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.

सोशल मीडियावरील आवाहनांवरही पोलिसांची करडी नजर

अनेकदा व्हॉट्सॲप, फेसबुक किंवा एक्स यांसारख्या सोशल मीडिया माध्यमांवरून मेसेज प्रसारित करून अचानक मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना रस्त्यावर बोलावले जाते. यामुळे आता सोशल मीडियावर आंदोलनाचे आवाहन किंवा पोस्ट करण्यापूर्वी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर कोणीही विनापरवानगी सोशल मीडियावर आंदोलन पुकारले किंवा जमाव जमवण्याचा प्रयत्न केला, तर संबंधित व्यक्ती किंवा संघटनांविरूद्ध कारवाई करण्याचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.

येथेच मिळणार आंदोलनाला परवानगी

पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र रस्ते अडवून सर्वसामान्यांना वेठीस धरणे सहन केले जाणार नाही. यासाठी आंदोलकांना केवळ 'जिल्हाधिकारी कार्यालय परिसर' याच ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी दिली जाणार आहे. तसेच ओंकारेश्वर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या भागात मोर्चा काढण्यास पोलीस परवानगी देतील, मात्र शहरातील इतर कोणत्याही प्रमुख चौकात आंदोलन करण्यास सक्त मनाई असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT