Shalarth ID Scam : शालार्थ आयडी घोटाळ्यात पुण्यातील मोठा मासा गळाला; अटकेसाठी पथक मागावर

Shalarth ID Scam, Pune Connection : राज्यातील बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्याचे आता पुणे कनेक्शन उघड झाले आहे. पुण्यातील एका बड्या आसामीला लवकरच अटक केल्या जाण्याची शक्यता आहे.
Shalarth ID Scam | Prashant Wadile | ₹160 Crore Education Fraud
Shalarth ID Scam | Prashant Wadile | ₹160 Crore Education FraudSarkarnama
Published on
Updated on

Shalarth ID Scam Nashik : राज्यातील बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात आता रोज नवे खुलासे होत असून, बनावट शालार्थ आयडीप्रकरणी अटकेत असलेला धुळ्यातील प्रशांत वाडिले याचे एकएक कारनामे समोर येत आहे. वाडिलेच्या चौकशीतून आता या प्रकरणातील पुणे कनेक्शन उघड झाले आहे.

प्रशांत वाडिले याच्या चौकशीत आता पुण्यातील एक 'मोठा 'मासा' गळाला लागणार असल्याचे वृत्त आहे. वाडिलेचा जबाब व त्याने चौकशीत दिलेल्या माहितीनंतर पथक संशयिताच्या मागावर आहे. या प्रकरणात पुण्यात स्थायिक झालेल्या एका शिक्षण संस्था चालकाला लवकरच बेड्या ठोकल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वाडिलेच्या चौकशीत या घोटाळ्याची व्याप्ती आता केवळ उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबारपर्यंत मर्यादित नसून पुण्यापर्यंत पोहोचली आहे. शिक्षण विभागाचे बहुतांश महत्त्वाचे कामकाज व या घोटाळ्याची मुख्य सूत्रे तिथूनच हलली. पुण्यातील हीच व्यक्ती या रॅकेटचा मास्टरमाईंड असण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. पुण्यातील या बड्या आसामीला आता लवकरच अटक होण्याची दाट शक्यता आहे.

Shalarth ID Scam | Prashant Wadile | ₹160 Crore Education Fraud
Shalarth ID Scam : शालार्थ आयडी मिळवून देण्यासाठी 20 लाखांचा फिक्स रेट, प्रशांत वाडिलेने जमवलेली माया पाहून तपास यंत्रणा थक्क

वाडिले याने किती शिक्षकांची भरती केली, कोणकोणत्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांची भरती केली यासंदर्भात सखोल चौकशी केली जाणार आहे. वाडिलेने किती संस्थांचे बनावट प्रस्ताव तयार करून त्यांना मान्यता मिळवून दिली याचीही चौकशी केली जाईल. यामुळे वाडिलेच्या अटकेमुळे संबंधित शिक्षण संस्था चालकांनी पळ काढला असल्याची माहिती मिळते.

अटकेत असलेल्या वाडिले याने बनावट 'शालार्थ आयडी' तयार करून देण्यासाठी प्रतिव्यक्ती २० ते २५ लाख उकळले आहेत. यातील ६० टक्के रक्कम तो संबंधित अधिकाऱ्यांना देत असे. शिक्षकांचे वैद्यकीय बिले मंजुरी, वेतनाचा फरक काढून देण्यासाठी ५० टक्के 'कमिशन' घ्यायचा.

यातून मिळालेल्या पैशातून त्याने मोठी माया जमवली आहे. त्याची संपत्ती बघून तपास यंत्रणांचेही डोळे पांढरे झाले आहेत. दरम्यान आता वाडीले याच्या बँक खात्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्याकडे तपासाची सूत्रे आल्यानंतर गुन्ह्याची व्याप्ती पाहता तपासाचा वेग वाढला आहे.

Shalarth ID Scam | Prashant Wadile | ₹160 Crore Education Fraud
School ID scam: धक्कादायक; धुळे शहर पुन्हा चर्चेत, शहरातूनच हालत होती कोट्यावधींच्या शिक्षण घोटाळ्याची सूत्रे; पोलिसांनी कसा लावला छडा?

दरम्यान, वाडिलेच्या चालकास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. मात्र, त्याच्या आईने नाशिकला येऊन पोलिसांकडे आपला मुलगा दोषी नसल्याचे सांगितले. तेव्हा तिला रडू कोसळले. या चालकास पोलिसांनी चौकशी करून सोडून दिले असून, त्याचा मोबाइल मात्र पोलिसांनी जप्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com