Pune Police  Sarkarnama
पुणे

Pune Crime News: मोठी बातमी: विषारी दारूकांड प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यातील 3 वरिष्ठ अधिकारी सस्पेंड,नव्या अधिकाऱ्याची एन्ट्री

Pune Toxic Liquor Case : पिंपरी-चिंचवड येथील फुगेवाडीत विषारी दाऊ पिऊन आठ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. यानंतर हडपसर येथेही पाच जणांचा विषारी दारु प्यायल्यानं मृत्यू झाल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांच्या तपासाची चक्र वेगानं फिरली.

Deepak Kulkarni

Pune News: पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर मृत्युच्या थैमानानं हादरून गेले आहे.गेल्या दोन दिवसांत एकूण 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील 11 जणांचा मृत्यू विषारी दारू प्यायल्यानं झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एकीकडे या घटनांमुळे संतापाची लाट उसळली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. आता या दारूकांडप्रकरणी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठी कारवाई करताना तीन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे.

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी(ता.29) पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. हडपसर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, हडपसर पोलीस चौकीच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार आणि गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी या पोलिस अधिकाऱ्यांचा निलंबन करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. तसेच हडपसर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी अशोक इप्पर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड येथील फुगेवाडीत विषारी दाऊ पिऊन आठ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. यानंतर हडपसर येथेही पाच जणांचा विषारी दारु प्यायल्यानं मृत्यू झाल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांच्या तपासाची चक्र वेगानं फिरली.

पुणे पोलिसांनी या प्रकरणात आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. तर दुसरीकडे विषारी दारू मृत्यू प्रकरणी योगेश वानखेडे या मुख्य संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. तो स्वतः पोलिसांसमोर हजर झाला होता, अखेर त्याला अटक करून चौकशी सुरू आहे.

पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी आणि हडपसरमध्ये विषारी दारू पिऊन घरी आल्यावर काही वेळानं तोंडातून फेस आलेला,तर कुणी चक्कर आल्यानं बाथरूममध्ये पडल्याचं तर कोणाला हृदयविकाराचा झटका आल्याचं समोर आलं होतं.

या दोन्ही घटनांमधील मृतांमध्ये तरुणांपासून वृद्धांपर्यंतचा समावेश आहे.शहरात घडलेल्या या घटनांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर हादरलं आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील फुगेवाडी भागात एकाच दिवशी 8 जणांच्या मृत्यूने खळबळ माजली. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू हा विषारी दारूमुळे झाल्याचे समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, अटकेतील आरोपी योगेश वानखेडेच पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी आणि पुण्याच्या हडपसर भागात केमिकलयुक्त स्पिरिट पोहोचवलं होतं. या स्पिरिटपासून बनवलेली घातक हातभट्टीची दारू प्यायल्याने पिंपरीत 6 जणांना जीव गमवावा लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT