Walmik Karad 1 Sarkarnama
पुणे

Walmik Karad : वाल्मिक कराड नाशिकच्या कोणत्या हस्तरेषा तज्ञाकडं गेला होता; तृप्ती देसाई यांच्या दाव्यानं खळबळ

Pune Trupti Desai Beed Santosh Deshmukh murder Walmik Karad Nashik : भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराड सरेंडर होण्यापूर्वी भविष्य बघितल्याचा दावा केला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : बीड येथील मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरण राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या हत्या प्रकरणानंतर रोज नवनवीन खुलासे होत आहेत.

आता पुन्हा एकदा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराड याच्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणांमध्ये वाल्मिक कराड हा मास्टरमाईंड असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून होत आहे. एसआयटीने देखील त्याला हत्येच्या कटाच्या गुन्ह्यात वर्ग करून घेत चौकशी केली आहे. खंडणीच्या गुन्ह्यात 'मकोका' लागलेला वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे मंत्री मुंडे यांचा देखील राजीनाम्याची सातत्याने मागणी होत आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या प्रकरणांमध्ये सातत्याने धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करताना पाहायला मिळत आहेत.

यापूर्वी देखील तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराड हा पसार असताना त्याने नाशिक (Nashik) येथील एका आश्रमामध्ये शरण घेतली होती, असा दावा केला होता. तसेच आश्रमातील प्रमुखावर महिलांच्या छळाबाबत देखील आरोप केले होते. यानंतर पुन्हा एकदा तृप्ती देसाई यांनी आता नवीन आरोप केले आहेत.

तृप्ती देसाई म्हणाल्या , "वाल्मिक कराड 15 आणि 16 डिसेंबर रोजी दिंडोरी आश्रमात मुक्कामाला होता. तो 17 डिसेंबरला दिंडोरी आश्रमातून निघाल्यानंतर नाशिक शहरातील "शरणपूर रोड" येथे हस्तरेषातज्ञांकडे भविष्य बघण्यासाठी गेला होता. खंडण्या मागायच्या, इतरांचे आयुष्य उद्धवस्त करायचे आणि स्वतःच भविष्य बघायला एखाद्याकडे जायचं ही क्रूर मानसिकता आहे".

'नाशिक पोलिसांनी 17 डिसेंबरचे शरणपूर रोडचे सीसीटीव्ही तपासावेत. ज्यांच्याकडे तो गेला होता ते सीसीटीव्हीमध्ये दिसल्यानंतर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा', अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT