Ratnagiri Shivsena : 'भविष्यात शत प्रतिशत शिवसेनाच'; शिंदेंच्या आमदाराचा ऑपरेशन टायगरचा निर्धार

MLA Kiran Samant : रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ऑपरेशन टायगर होताना दिसत असून येत्या काळात याची झलक पुण्यात देखील पाहायला मिळेल असे संकेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.
Shivsena Anniversary
Shivsena AnniversarySarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : रत्नागिरीसह पुणे आणि काही इतर जिल्ह्यात ऑपरेशन टायगर केले जाईल, असे स्पष्ट संकेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे अनेक ठिकाणी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली जात आहे. तर त्यांच्या रत्नागिरीत जिल्ह्यात देखील ऑपरेशन टायगर जोर धरत असून गेल्या काही दिवसात ठाकरे गटातील अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांचा शिंदे सेनेत प्रवेश झाला आहे. आता येथील शिंदे सेनेचे आमदार किरण सामंत यांचे एक वक्तव्य सध्या जिल्ह्यासह राज्यात चर्चेत आले आहे.

एकीकडे उद्योग मंत्री उदय सामंत हे ऑपरेशन टायगर करणारच असा निर्धार केला आहे. त्याप्रमाणे राज्याच्या विविध भागासह प्रामुख्याने रत्नागिरीवर लक्ष केंद्रीत केले आहे. सध्या त्यांचे बंधू आमदार किरण सामंत जिल्ह्यात शिवसेना शिंदे वाढवण्यासाठी लांज्यात तळ ठोकून काम करत आहेत.

येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लावण्याचे काम केलं आहे. लांज्यात शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी (ता.3) शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला आहे. आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत हे प्रवेश पार पडलेत. याआधी देखील लांज्यातील काही पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी प्रवेश केला होता.

Shivsena Anniversary
Kiran Samant: मला खासदार बनवायला महायुती सक्षम, पण साळवी शिंदेंसोबत आले नाहीत तर..., सामंतांनी फटकारलं

यावेळी किरण सामंत यांनी, लांजा-राजापूर मतदार संघ शत:प्रतिशत शिवसेना करण्याचा निर्धार सामंत यांनी केला आहे. त्यांनी, जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, ग्रांपंचायतीवर शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी घेतली आहे.

Shivsena Anniversary
Kiran Samant News: किरण सामंत 'नॉट रिचेबल'च्या चर्चा, भाऊ उदय सामंतांचा मोठा खुलासा; तर ठाकरे गटाची मोठी मागणी

उबाठा संपणार

लांजा-राजापूर मतदार संघ हा उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांचा बालेकिल्ला मानला जातो. पण आता तेच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यातच जिल्ह्यात ऑपरेशन टायगरमुळे अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. यामुळे मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गट उरतोच किती हे पाहावं लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com