Ravindra Dhangekar, arvind shinde Sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar Joins Shivsena : पुण्यातील वाल्मिक कराड रवींद्र धंगेकर? पक्ष सोडताच काँग्रेस नेत्याचा धंगेकरांवर गंभीर आरोप

Ravindra Dhangekar Party Switch : कसबा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी (ता.१०) एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. धंगेकरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देताच पुणे काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

Sudesh Mitkar

Pune News 11 Feb : कसबा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी (ता.१०) एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. धंगेकरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देताच पुणे काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

धंगेकर भीतीपोटी आणि आमिषापोटी शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याचं अरविंद शिंदे यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना पक्षाने भरभरून दिलं. पक्ष कुठेच कमी पडला नाही. पक्षाने त्यांना चार वेळा तिकीट दिलं. कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास अनेक जण इच्छुक होते.

त्यावेळी रवींद्र धंगेकर यांना तिकीट देण्यास माझा विरोध होता. मात्र, पक्षाकडून काही समीकरणं सांगण्यात आली आणि त्यांना तिकीट देण्यात आलं. मी कसबा विधानसभा मतदारसंघातून जेव्हा काँग्रेसकडून (Congress) निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांनी मला मदत केली नव्हती.

त्यांनी पक्ष विरोधात काम केलं होतं, असं असताना देखील पक्षाने तीन वर्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून धंगेकरांना चार वेळा संधी दिली. ज्यादिवशी ते आमदार झाले त्यानंतर कधीच पक्षाचा झेंडा त्यांनी हातात घेतला नाही. पक्षाच्या कोणत्याही आंदोलनाला अथवा बैठकीला ते उपस्थित राहत नव्हते. पक्षाने माझ्यासाठी काम करावं मी पक्षासाठी काम करणार नाही अशी भूमिका त्यांची होती.

त्यामुळे यापुढे पक्षाला विनंती असेल की अशा लोकांना पक्षात घेऊ नये. सातत्याने पक्ष बदलण्याचा त्यांचा इतिहास आहे. कोणत्याही बैठकीला, आंदोलनांना ते येत नाहीत अशी तक्रार अनेकदा आम्ही पक्षाकडे केली होती. त्याबाबत त्यांना अनेकदा समज देखील देण्यात आली होती. मात्र त्यांच्यात बदल झाला नाही.

धंगेकरांनी मतलबी राजकारण केलं आहे. त्यांच्या टेंडरमध्ये प्रॉब्लेम येत होते म्हणून त्यांनी पक्ष सोडला आहे. तसेच वक्फ बोर्डच्या जागेचा वाद होता. वक्फ बोर्डचा विषय होता त्यात त्यांच्यावर कारवाई होणार होती म्हणून पक्ष सोडला, असा आरोप शिंदे यांनी यावेळी केला.

रवींद्र धंगेकरांच्या ऑफिसमधील एक व्हिडिओ व्हायला होतं आहे. ज्यामध्ये काही आर्थिक देवाणघेवाणी बाबत बोललं जात आहे. सुरेश धसांच्या भाषेत बोलायचं झालं तरं सेटलमेंट करणाऱ्यां आकांचा आका वाल्मिक कराड (Walmik karad) आहे का? असं म्हणत पुण्यातील वाल्मिक कराड रवींद्र धंगेकर आहेत का? असा सवाल अरविंद शिंदे यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT