Ravindra Dhangekar: धंगेकरांच्या शिवसेनेतील 'एन्ट्री'मुळे शिंदेंची ताकद वाढली तर भाजपची डोकेदुखी...

Shivsena Vs BJP Politics : रवींद्र धंगेकर हे मूळचे शिवसैनिक असले तरी त्यांची राजकारण करण्याची पध्दत वेगळी आहे. त्यांच्यासारखा पुण्याचं राजकारण कोळून पिलेला नेता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आता मिळाला आहे.
Ravindra Dhangekar, Eknath Shinde
Ravindra Dhangekar, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Pune News : ज्या रवींद्र धंगेकरांनी 2023 च्या पोटनिवडणुकीत भाजपच्या कसब्याच्या गडाला सुरुंग लावण्याचं काम केलं होतं. महायुतीची प्रचंड मोठी यंत्रणा समोर असताना धंगेकरांनी आपल्या मतदारसंघातील कामाच्या पोचपावतीवर बाजी पलटवत भाजपचा कसबा गड खालसा केला होता. हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला होता.

याचमुळे ज्यावेळी धंगेकर काँग्रेस सोडण्याच्या मानसिकतेत असल्याची कुणकुण कानावर पडतीच महायुतीतील तीन तीन पक्षांनी त्यांच्या पक्षप्रवेशासाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती. पण अखेर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची पुण्यातील ताकद चांगलीच वाढली आहे. तर भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद असूनही पुण्यात शिवसेनेची ताकद वाढली नव्हती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयारीला लागलेल्या शिंदेंसारख्या कसलेल्या नेत्याला ही गोष्ट कुठंतरी खटकत होती.त्यातच काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील पाच माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेचा मार्ग सोडून थेट भाजपची वाट धरली. यामुळे शिंदे पुण्यातील शिवसेना नेत्यांवर प्रचंड संतापले. त्यांनी कडक शब्दांत त्यांची कानउघडणी केलीच,शिवाय आपल्या विश्वासू नेत्याला पुणे मिशनवर पाठवलं.

महायुती पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये ऑपरेशन टायगर चर्चेत आहेत. या ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंच्या सेनेमध्ये नाराज असलेल्या नेत्यांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेतून करण्यात येत आहे. आगामी महापालिका निवडणुक पूर्वी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी हे मिशन टायगर राबवण्यात येत आहेत. पण त्याचदरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट काँग्रेसलाच मोठा धक्का देत रवींद्र धंगेकरांनाच गळाला लावले.

Ravindra Dhangekar, Eknath Shinde
Mahayuti On Shaktipeeth: विरोध झुगारत अन् नाकावर टिच्चून CM फडणवीस साकारणार 'ड्रीम प्रोजेक्ट'; 'शक्तिपीठ'साठी बजेट वाढवलं...

उद्योगमंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उदय सामंत यांनी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देत रवींद्र धंगेकरांना शिवसेनेत आणलंच.स्वत:धंगेकरांनी शिंदेंसमोरच त्यांच्या पक्षप्रवेशासाठी सामंतांनी प्रचंड जुळवाजुळव केल्याचं स्पष्ट केलं. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरपासून काँग्रेस पक्षाशी जरा फटकून वागत असलेल्या धंगेकरांवर शिवसेनेची करडी नजर होती. याचमुळे सामंतांनी पडद्यामागून प्रचंड वेगात सूत्रे फिरवत धंगेकरांना पक्षात आणलं.

रवींद्र धंगेकर हे मूळचे शिवसैनिक असले तरी त्यांचं राजकारण करण्याची पध्दत वेगळी आहे. त्यांच्यासारखा पुण्याचं राजकारण कोळून पिलेला नेता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आता मिळाला आहे. त्यांच्यासारखा पुणेकरांच्या प्रश्नांचं,राजकारणाचं,अन्यायाविरुद्ध आक्रमकता दाखवण्याची डेअरिंग असलेला नेता सोबत आल्यामुळे शिवसेनेला मोठं बळ मिळालं आहे.

Ravindra Dhangekar, Eknath Shinde
MLA Sandip Kshirsagar News : बीडमध्ये ऑडिओ-व्हिडिओ 'वाॅर'! आमदार संदीप क्षीरसागर यांनी तहसीलदाराला धमकी दिल्याची क्लीप व्हायरल..

रवींद्र धंगेकर यांनी दरम्यानच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतल्याने ते लवकरच शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश करतील असं बोललं जात होतं. सुरुवातीला ठाकरेंच्या शिवसेनेपुरतं मर्यादित असलेले हे मिशन टायगर आता काँग्रेस आणि मनसेच्या नाराज नेत्यांपर्यंत पोहोचला आहे. मनसे आणि काँग्रेसच्या नाराज नेत्यांना देखील आपल्या पक्षात घेण्यासाठी शिंदेंच्या सेनेतून प्रयत्न होत असल्याचं सांगितलं जात आहे.

पण रवींद्र धंगेकरांसारखा आक्रमक नेता शिवसेनेत दाखल होताच एकनाथ शिंदेंनी भाजपलाच ललकारलं आहे.पोटनिवडणुकीवेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी हूज इज धंगेकर असं विधान करत धंगेकरांना डिवचलं होतं. पण त्यांनीच भाजपचा कसबा मतदारसंघ खेचून आणल्यानंतर पाटलांचा हिशेब चुकता केला होता. पण आता शिंदेंनी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांच्या हूज इज धंगेकरचा संदर्भ घेत शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.तुम्ही आता शिवसेनेत आला, लोकांना कळेल,हू इज धंगेकर असं म्हणत एकप्रकारे मित्रपक्ष भाजपलाच कडक इशारा दिला असल्याचं बोललं जात आहे.

Ravindra Dhangekar, Eknath Shinde
Mahayuti Government Announcement: विरोधकांना घाम फुटणार? महायुती सरकारनं अर्थसंकल्पात केली 'ही' मोठी घोषणा

आगामी पुणे महापालिका निवडणुकीत रवींद्र धंगेकरांसारखा शहरातलं राजकारण,नागरिकांच्या समस्या असं सगळं पंचवीस तीस वर्षांपासून जवळून पाहणारा नेता शिवसेनेकडे असणार आहे. त्यामुळे जरी कसबा मतदारसंघ सध्या भाजपकडे असला तरी आमदारकीच्या काळात काँग्रेसनं त्यांचा वापर पुणे आणि संबंध महाराष्ट्राच्या राजकारणातही चांगलाच करुन घेतला आहे.

त्यातच धंगेकरांची कसबा मतदारसंघातली तळागळापर्यंत पोहचलेली मतदारांवरची पकड आणि विश्वास शिवसेनेसाठी नक्कीच फायद्याचा ठरण्याची शक्यता आहे. याचमुळे धंगेकरांसारखा नेताच भाजपसाठी आगामी पुणे महापालिका निवडणुकीत मोठी डोकेदुखी ठरतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com