Mulshi Dam Water Issue Sarkarnama
पुणे

Pune Water Crisis : नेत्यांचं दुर्लक्ष! मुळशीच्या पाण्यासाठी पुणेकरांनाच सत्याग्रह करावा लागणार?

Mulshi Dam Water Issue : दिवसेंदिवस पुणे शहरात पाण्याची मागणी वाढत आहे. मात्र, त्या प्रमाणात पाणी कोटा मंजूर होत नाहीये. मागील अनेक वर्षांपासून मुळशी धरणातून 5 टीएमसी पाणी देण्याची मागणी सतत केली जात असली तरीही ती मंजूर केली जात नाही.

Jagdish Patil

Pune News, 06 Feb : दिवसेंदिवस पुणे शहरात (Pune City) पाण्याची मागणी वाढत आहे. मात्र, त्या प्रमाणात पाणी कोटा मंजूर होत नाहीये. मागील अनेक वर्षांपासून मुळशी धरणातून 5 टीएमसी पाणी देण्याची मागणी सतत केली जात असली तरीही ती मंजूर केली जात नाही.

शहराची वाढत असलेली हद्दीचा आणि लोकसंख्येचा विचारात घेऊन पाणी कोटा मंजूर करावा. यासाठी यासाठी शहरातील आमदारांनी आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे. मात्र, लोकप्रतिनिधींनी काही भूमिका न घेतल्यास पुणेकरांना मुळशीच्या पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागणार आहे.

पुणे (Pune) शहराला खडकवासला धरणातून 11.6 टीएमसी, भामा आसखेड धरणातून 2.67 टीएमसी, पवना धरणातून 0.34 टीएमसी असा एकूण 14.61 टीएमसी पाणी कोटा 2024-05 साठी पाटबंधारे विभागाने मंजूर केला आहे. शहराची वाढलेली हद्द, वाढणारी बांधकामे, त्यामुळे वाढणारी लोकसंख्या याचा विचार करता हा पाणी कोटा अपुरा आहे.

सध्या पुणे महापालिका दिवसाला 1637 एमएलडी पाणी या धरणांमधून घेत असून, वर्षाला 21.48 टीएमसी पाणी लागत आहे. पुण्यातील बहुतांश भाग खडकवासला धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. खडकवासला धरणाची क्षमता 29 टीएमसी इतकी आहे. मात्र शहराची पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या धरणातून पुणे जिल्ह्यात शेतीसाठी आणि पुण्यासाठीही पुरेसा पाणी साठा शिल्लक ठेवावा लागतो.

त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याची कसरत पाटबंधारे विभागाला करावी लागते. शिवाय महापालिकेला (PMC) पाण्याचा वापर कमी करण्याचा इशारा वारंवार दिला जातो. तरीही शहराची पाण्याची मागणी वाढत असून भर उन्हाळ्यात पाणी कपात करणं अशक्य आहे. मुळशीच्या पाण्यासाठी ऑगस्ट 2021 मध्ये ठराव करण्यात आला होता. महापालिकेच्या मुख्य सभेने धरणातून 5 टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यासाठीचा ठराव राज्य सरकारला पाठवला होता.

त्यानंतर पुण्यातील नेत्यांनी अनेकदा भाषणामध्ये मुळशीचे पाणी पुण्यात आणण्यासाठी शासन स्तरावर बैठका घेणार असल्याचं आश्वासनही दिलं होतं. मात्र, अद्याप मुळशीचं पाणी पुणेकरांच्या वाट्याला आलेलं नाही. दरम्यान, जर शासनाने मुळशीचे 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला तरी ते पाणी लगेच उपलब्ध होणार नाही. त्यासाठी महापालिकेला धरणापासून शहरापर्यंत जलवाहिनी टाकणे, जलशुद्धीकरण केंद्र, जॅकवेल उभारणे अशी विविध कामे करावी लागतील.

यासाठी 2 ते 3 वर्षे जातील. त्यामुळे मुळशी धरणातील पाणी लवकरात लवकर उपलब्ध झाल्यास शहराला दिलासा मिळेल. अन्यथा मोठ्या पाणी टंचाईचा सामना पुणेकरांना करावा लागू शकतो. दरम्यान, महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 32 गावांना सध्या 321 एमएलडी पाण्याची गरज आहे. तर महापालिकेच्या जलवाहिनीने 93 तर टँकरने 6 एमएलडी असे 100 एमएलडी पाणी पुरवठा केला जात आहे. या गावांमधील पाणी पुरवठा योजना या पुढील 5-6 वर्षात पूर्ण होणार होईल तेव्हा आणखी पाण्याची मागणी वाढणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT