Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांवर संतापले, पाणी प्रश्नांसाठी तरी थोडा वेळ काढा!

Chhagan Bhujbal; Bhujbal criticize CM Devendra fadnavis and Eknath Shinde on water issue-मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेल्या दोन वर्षांपासून पाणी प्रश्नासाठी बैठक घेऊ शकलेले नाही
Devendra Fadanvis, Eknath Shinde & Chhagan Bhujbal
Devendra Fadanvis, Eknath Shinde & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News: विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या निमित्ताने विविध आमदार आपल्या शमतदारसंघातील प्रश्नांवर विधिमंडळात चर्चा घडवत आहे. यामध्ये सरकारच्या माध्यमातून रखडलेले प्रश्न सुटावेत अशी सगळ्यांचीच इच्छा आहे.

माजी मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विधानसभेत एका गंभीर समस्येला तोंड फोडले. शासनाच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याचे प्रश्नांचे विविध प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. पाठपुरावा केल्यावर संबंधित विभागाचे प्रधान सचिव मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत त्याचा समावेश करतात. मात्र, हे प्रश्न सातत्याने रेंगाळलेले आहे.

Devendra Fadanvis, Eknath Shinde & Chhagan Bhujbal
Dhananjay Munde Politics: धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला, भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी होणार की टळणार?

येवला मतदार संघातील पिण्याच्या पाण्याच्या काही योजनांबाबत भुजबळ यांनी विधिमंडळात लक्ष वेधले. नगरोत्थान योजनेअंतर्गत हे प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र आधीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यानंतर एकनाथ शिंदे आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत.

Devendra Fadanvis, Eknath Shinde & Chhagan Bhujbal
Devendra Fadnavis कोल्हापूर दौऱ्यावर... 'साहेब, या दोन मुद्द्यांना आज तडीस लावाच!'

या विषयावर बैठक घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सवडच मिळालेली नाही. लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नावर तरी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेण्यासाठी वेळ काढली पाहिजे. कितीही कामे असली तरी हे प्रश्न गंभीर आहेत, याकडे भुजबळ यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

यानिमित्ताने सत्ताधारी पक्षाच्याच एका ज्येष्ठ सदस्याने आणि प्रदीर्घ काळ मंत्री राहिलेल्या भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर दिला आहे. नगरोत्थान योजनेच्या मंजुरीच्या कार्यपद्धतीत मुख्यमंत्र्यांची बैठक अत्यावश्यक आहे. याबरोबरच अशा अनेक योजना देखील असून त्या मुख्यमंत्र्यांना बैठक घेण्यासाठी वेळ नसल्याने प्रदीर्घकाळ रेंगाळल्या आहेत.

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. राज्यातील अनेक शहरे आणि गावे तहानलेली आहेत. अशा गावांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी योजना शासनाला सादर केल्या आहेत. त्यामुळे हा पेच निर्माण झाला आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी यावर व्यक्तिशः भेटून लक्ष वेधले असावे. मात्र त्याला फारसा प्रतिसाद किंवा यश आलेले दिसत नाही. त्यामुळेच एका ज्येष्ठ सहकार्याला सभागृहात थेट मुख्यमंत्र्यांना टीकेचे लक्ष्य करावे लागल्याचे चित्र आहे.

___

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com