Amitesh Kumar 
पुणे

Pune Weapon license: स्टेट्ससाठी बंदुकीचं लायसन्स आता विसरा! पोलीस आयुक्तांचा दणका, नेमकं काय घडलंय?

Pune Weapon license: पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शस्त्रपरवाना बाबत कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या दीड वर्षात शस्त्र परवान्यांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी तब्बल 440 अर्जांना नकार देण्यात आला आहे.

Sudesh Mitkar

Pune Weapon license: पुण्यात गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली असून शस्त्र घेऊन मिरवणाऱ्यांची आणि बंदुकीचा धाक दाखवून गुन्हेगारी कृत्यांचं प्रमाणही वाढलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता सुरक्षेच्या कारण दाखवून केवळ स्टेटससाठी म्हणून जर कोणाला बंदुकीचा परवाना घ्यायचा असेल तर तो मिळणार नाही.

कारण याचीच कडक शहानिशा करुन पुणे पोलिसांनी गेल्या दीड वर्षात तब्बल ४४० बंदुकीचे परवाने रद्द केले आहेत. त्याचबरोबर १४० जणांचे शस्त्र परवानगेही रद्द करण्यात आले आहेत. शस्त्र परवान्यांबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर भूमिका घेतली आहे.

तब्बल 572 अर्ज दाखल

1 जानेवारी 2024 ते 3 जून 2025 या कालावधीत शस्त्र परवान्यासाठी पुणे पोलिसांकडं एकूण 572 अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची कसून छाननी केल्यानंतर यांपैकी केवळ 28 अर्जांना परवानगी देण्यात आली, तर तब्बल 440 अर्ज फेटाळण्यात आले. यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 43 जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. तर परवाना नूतनीकरण न केल्यामुळं आणखी 97 परवाने बाद झाले आहेत. याशिवाय, काही संशयीत व्यक्तींना शस्त्र परवान्यांसंदर्भात कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.

प्रलंबित अर्ज निकाली

मागील अनेक वर्षांपासून शस्त्र परवान्यासाठी नागरिकांनी केलेले अर्ज पुणे पोलिस आयुक्तालयात प्रलंबित होते. मात्र, त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता. पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्त अमितेश कुमार यांनी हे सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढले आहेत. या प्रक्रियेत नागरिकांनी केलेले बहुतांश अर्ज नाकारण्यात आले आहेत.

स्वसंरक्षणासाठी परवाना

अनेक अर्जांमध्ये ‘स्वसंरक्षणासाठी परवाना हवा’ असं कारण नमूद करण्यात आलं होतं. मात्र, पोलिसांनी केवळ किरकोळ अथवा असमर्थनीय कारणांसाठी शस्त्र परवाना देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. समाजात भीतीचं वातावरण निर्माण होईल, अशा प्रकारे शस्त्र परवाने दिले जाणार नाहीत, असं स्पष्ट धोरण पोलीस आयुक्तांनी आखलं आहे. परिणामी, पुण्यात शस्त्र परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना आता अधिक ठोस, विश्वासार्ह आणि जबाबदारीची कारणं द्यावी लागणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT