Election officials verify duplicate voters ahead of Zilla Parishad elections. Sarkarnama
पुणे

pune ZP elections : ZP साठी दुबार मतदारांना द्यावं लागणार हमीपत्र, नेमकं कुठं मतदान करणार आधीच सांगावं लागणार

Election Commission Check Duplicate Voters : दुबार मतदारांना रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून हमीपत्र घेण्याची पद्धत अवलंबली जाणार आहे. त्याबरोबर कोणत्या ठिकाणी मतदान करणार याची नोंद ठेवून आयोगाकडून दुसऱ्या ठिकाणच्या मतदार यादीतून त्यांचे नाव काढून टाकण्याची प्रक्रियादेखील या निमित्ताने होऊ शकेल.

Sudesh Mitkar

Pune News, 31 Jan : महानगरपालिका निवडणुकी दरम्यान मोठ्या प्रमाणात दुबार मतदारांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. वारजे परिसरात शाई पुसून दुबार मतदान करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून झाला होता.

या पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने दुबार मतदारांना रोखण्यासाठी पावले उचलली असून त्यासाठी वेगळी शक्कल लढवली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यामध्ये २९ लाख ७६ हजार ४५४ मतदार आहेत. त्यापैकी याच मतदारांमध्ये दुबार ६७ हजार नावे आहेत.

या मतदारांच्या नावांपुढे राज्य निवडणूक आयोगाने दुबार म्हणून दोन स्टार मारून मतदार यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिली आहे. तालुका पंचायत समिती स्तरावर असलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संभाव्य दुबार मतदारांची नावे लक्षात घेऊन ही नावे खरोखरच दुबार आहेत का, याची पडताळणी करून घ्यावी, अशा सूचना आयोगाकडून देण्यात आल्या आहेत.

पहिल्या प्रक्रियेमध्ये दुबार मतदारांची नावे त्यांचे वय, पत्ते याची बीएलओमार्फत तपासणी केली जाईल. या मतदारांशी संपर्क साधून तुम्ही कुठे मतदान करणार आहात त्याचे हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे. त्याची नोंद स्वतंत्रपणे केली जाणार आहे. तसेच ज्या ठिकाणी मतदान करणार आहे, त्या ठिकाणी मतदान करणार असल्याचे हमी पत्रदेखील संबंधित मतदारांना द्यावे लागेल.

दुबार मतदारांना रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून हमी पत्र घेण्याची पद्धत अवलंबली जाणार आहे. त्याबरोबर कोणत्या ठिकाणी मतदान करणार याची नोंद ठेवून आयोगाकडून दुसऱ्या ठिकाणच्या मतदार यादीतून त्यांचे नाव काढून टाकण्याची प्रक्रियादेखील या निमित्ताने होऊ शकेल.

जिल्हा परिषद निवडणुकीचे कार्यक्षेत्र हे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतचे क्षेत्र आहे. यामध्ये महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्र नाही. त्यामुळे ज्या दुबार मतदारांची नावे पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका किंवा जिल्ह्यातील नगर परिषदा, नगरपंचायतींमध्ये आहेत. त्यांच्या दुबार नावाचा अंतर्भाव आणि नावापुढे स्टार आलेला नाही. त्यामुळे दुबार मतदारांना आळा घालण्यात आयोगाला पूर्णपणे यश मिळण्याची शक्यता कमी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT