Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीपूर्वीच शरद पवारांनी थेट बारामतीतून स्पष्ट केली आपली भूमिका; म्हणाले, "तटकरे आणि पटेल..."

Sharad Pawar Reaction on Sunetra Pawar Oath : "अजित पवार हे कर्तृत्ववान नेते होते. त्यांना पक्षाने आणि बारामतीकरांनी अखंड साथ दिली. अशी काम करणारी कर्तृत्ववान व्यक्ती सोडून जाते हा मोठा आघात आम्हा सर्वांवर झाला आहे. मात्र, या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. अजितची काम करण्याची पद्धत चालू ठेवावी लागेल. "
Senior NCP leader Sharad Pawar addresses the media in Baramati, responding to political discussions following Ajit Pawar’s death and Sunetra Pawar’s oath ceremony.
Senior NCP leader Sharad Pawar addresses the media in Baramati, responding to political discussions following Ajit Pawar’s death and Sunetra Pawar’s oath ceremony.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 31 Jan : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या चारच दिवसांत त्यांच्या रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार या आज विराजमान होणार आहेत.

मात्र, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा हा निर्णय सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांना न विचारता घेतल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच आता या सर्व चर्चांवर थेट जेष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

आज सकाळी त्यांनी बारामतीतून पत्रकार परिषद घेत सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, अजित पवार हे कर्तृत्ववान नेते होते. त्यांना पक्षाने आणि बारामतीकरांनी अखंड साथ दिली. अशी काम करणारी कर्तृत्ववान व्यक्ती सोडून जाते हा मोठा आघात आम्हा सर्वांवर झाला आहे.

मात्र, या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. अजितची काम करण्याची पद्धत चालू ठेवावी लागेल. आमच्या कुंटुबातील नवी पिढी नक्की हे करेल असा विश्वास आहे, असं पवार म्हणाले. दरम्यान, यावेळी पत्रकारांनी अजित पवारांना जाऊन ४ दिवस झाले नाहीत तोवर त्यांच्या पदाबाबत चर्चा सुरू आहे. याकडे तुम्ही कसं बघता, ही जास्त घाई होत नाही का? असं विचारताच शरद पवार म्हणाले, "या विषयाची आम्ही इथे चर्चाच करत नाही. ही चर्चा इथे झाली नाही. ती मुंबईत सुरू आहे.

Senior NCP leader Sharad Pawar addresses the media in Baramati, responding to political discussions following Ajit Pawar’s death and Sunetra Pawar’s oath ceremony.
Mahesh Landge: दादा मला माफ करा! शोकसभेत हात जोडून महेश लांडगेंनी दिवंगत अजित पवारांची मागितली जाहीर माफी

सुनील तटकरे, प्रफुल पटेल हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलं आहे. त्यावर आम्ही काही भाष्य करणार नाही., असं म्हणत शरद पवारांनी एक प्रकारे या सर्व चर्चेपासून त्यांना अजित पवारांच्या नेत्यांनी दूर ठेवल्याचं स्पष्ट केलं.

Senior NCP leader Sharad Pawar addresses the media in Baramati, responding to political discussions following Ajit Pawar’s death and Sunetra Pawar’s oath ceremony.
NCP Politics : "आता शरद पवार यांनीच पुढाकार घ्यावा..."; नरहरी झिरवाळ यांचं मोठं वक्तव्य

दरम्यान, यावेळी शरद पवार यांनी अजित पवारांसोबत दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चा झाली होती. १२ तारखेला याबाबतची घोषणा होणार होती. मात्र, त्याआधीच हा मोठा आघात झाल्याचंही पवारांनी सांगितलं, त्यामुळे कालपासून शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवलं जात आहे का? असे जे प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यावर आता पवारांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरणच दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com