ED Action Sarkarnama
पुणे

ED चा दणका शिक्षण विभागातील आधिकाऱ्यांना : पाच जणांची होणार चौकशी

शिक्षक भरतीच्या या प्रकरणात मनी लॉन्ड्रींग (Money Laundering) झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्याने ‘ईडी’ची एन्ट्री झाल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे जिल्हा जिल्ह्यातील (Pune District) खासगी अनुदानीत शाळांमधील शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी थेट सक्त वसुली संचलनालयाकडून (Enforcement Directorate) होणार आहे. या प्रकरणाची चौकशी करून हे प्रकण उघडकीस आणणाऱ्या तत्कालिन शिक्षण विस्तार आधिकाऱ्याचा जबाब येत्या दोन ऑगस्टला ‘ईडी’कडून नोंदविण्यात येणार आहे. किसन भुजबळ असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. शिक्षण विभागातील `सिंघम` म्हणून भुजबळ यांची ओळख आहे. त्यांच्यामुळे कोट्यवधी रुपयांचा शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आला आहे.

या प्रकरणी २०१९ मध्ये तत्कालिन शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्यासह शिक्षण विभागातील पाच आधिकाऱ्यांसह शिक्षण संस्थेशी संबंधित तीन जणांविरोधात पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार हा घोटाळा सुमारे ५० कोटी रूपयांचा आहे. आणखी खोलात गेल्यास यातून मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता असल्याने ‘ईडी’कडून स्वत:हून या प्रकरणात चौकशीसाठी संबंधित आधिकाऱ्याला बोलविण्यात आले आहे.या आधिकाऱ्याचा जबाब घेतल्यानंतर यातून ईडीच्या हाती बरीच माहिती लागण्याची शक्यता आहे.

शिक्षण भरतीच्या या प्रकरणात मनी लॉन्ड्रींग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्याने ‘ईडी’ची एन्ट्री झाल्याचे सांगितले जात आहे. या भरती प्रकरणात संबंधित शिक्षण विस्तार आधिाकाऱ्याच्या तत्परतेमुळे घोटाळा झाल्याचे उघड झाले. या प्रकरणात पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तत्कालिन शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्यासह शिक्षण विभागातील पाच आधिकारी व संबंधित शिक्षण संस्थेतील पदाशधिकारी, मुख्याध्यापक यांचा समावेश आहे.

राज्यात शिक्षण संस्था किंवा शिक्षक भरती प्रकरणात ‘ईडी’ची चौकशी सुरू होण्याची ही पहिली घटना ठरणार आहे.तत्कालिन शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांना अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले होते. जाधव यांच्यावर त्यावेळी झालेल्या आरोपामुळे त्यांच्याकडून प्रवेश प्रक्रियेची जबाबदारी काढून घेण्यात आली होती. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात ‘ईडी’ची एन्ट्री झाल्याने तत्कालिन उपसंचालक रामचंद्र जाधव यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT