Ankita Patil elected as chairperson in Pune Zilla Parishad, marking a political boost for Harshvardhan Patil with support from Deputy CM Sunetra Pawar. Sarkarnama
पुणे

Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेत अंकिता पाटलांना मोठी जबाबदारी : अजितदादांनंतर सुनेत्राताईंचंही हर्षवर्धन पाटलांना राजकीय बळ

Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेत अंकिता पाटील यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी निवड झाली. सुनेत्रा पवार यांच्या पाठिंब्यामुळे हर्षवर्धन पाटील गटाची ताकद वाढली.

Hrishikesh Nalagune

Pune Zila Parishad : दिवंगत अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही हर्षवर्धन पाटील यांना राजकीय बळ दिलं आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर गटनेतेपदासोबत एक सभापतीपदही इंदापूर तालुक्याला मिळाले आहे.

अजित पवार यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्याशी जुळवून घेतले होते. त्यांची मुलगी अंकिता पाटील यांना घड्याळ चिन्हावर उमेदवारी दिली होती. पण प्रचारादरम्यानच अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत अंकिता पाटील निवडून आल्या होत्या. आता सुनेत्रा पवार यांनी अंकिता यांनी सभापतीपदी संधी देत हर्षवर्धन पाटील यांच्या कुटुंबाला राजकीय बळ दिले आहे.

इंदापूर तालुक्याला मिळाले दुसरे पद :

यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेतेपद इंदापूर तालुक्याला दिले आहे. श्रीमंत पोपट ढोले यांची राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद गट नेतेपदी निवड केली. श्रीमंत ढोले हे दोन वेळा इंदापूर तालुक्यातून जिल्हा परिषद सदस्य झाले आहेत. त्यापाठोपाठ इंदापूर तालुक्यातीलच अंकिता पाटील यांनाही सभापतीपद देण्यात आले आहे.

चार सभापतीची बिनविरोध निवड :

पुणे जिल्हा परिषदेच्या चार सभापती पदांसाठी गुरूवार (ता.२) बिनविरोध निवड झाली. यात महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपदी अंकिता हर्षवर्धन पाटील, समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी जितेंद्र बडेकर (हवेली) तर उर्वरित दोन सभापतीपदांसाठी दिपाली हुलावळे (मावळ) आणि अमोल नलावडे (वेल्हे) यांची एकमताने निवड करण्यात आली.

दुपारी झालेल्या सर्वसाधारण सभेत यशवंत माने यांनी अंकिता पाटील, जितेंद्र बडेकर, दिपाली हुलावळे आणि अमोल नलावडे यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा केली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांनी अभिनंदन केले.

विविध समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी तसेच हवेली प्रांताधिकारी यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. याआधी दुपारी एक वाजेपर्यंत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे चार उमेदवारी अर्ज दाखल झाले. सभापती पदांच्या चार जागांसाठी फक्त चार उमेदवारी अर्ज दाखल झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT