Pune Crime : पुण्यातही अशोक खरात? अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण; गुन्हा दाखल, कोर्टात केस सुरू तरी भोंदूबाबा मोकाट

Ashok Kharat case impact In Pune : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली असून पुण्याच्या खेडमध्ये नुकताच संतप्त नागरीकांनी भगव्या वस्त्रधारी दोघांना चांगलाच चोप दिला होता. ही घटना ताजी असतानाच आता येथील शिवदत्त आश्रमात भोंदूचा भयंकर खेळ उघडकीस आला आहे.
Like Ashok Kharat bhondu baba
Like Ashok Kharat bhondu babasarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानंतर पुण्यातील चांडोलीत आणखी एक भोंदूबाबा प्रकरण समोर आले आहे.

  2. नवनाथ गवळी याच्यावर अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.

  3. अंधश्रद्धेचा फायदा घेत महिलांना जाळ्यात ओढल्यामुळे राज्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे.

Pune Khed News : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडवून दिली असून आता राज्यभर भोंदूबाबांचे अनेक कारनामे उघडकीस येत आहे. असेच काही भोंदूबाबांचे कारनामे पुण्यातही समोर आले आहेत. या कारनाम्यांमुळे ग्रामीण भागात संतापाची लाट पाहायला मिळाली असून खेडमध्येच नुकताच संतप्त नागरीकांनी भगव्या वस्त्रधारी दोघांना चांगलाच प्रसाद दिला होता. एका महिलेची पाच हजारांची फसवणूक केल्यावरून त्यांना एका वृद्धाने कानाखाली जाळ काढत काढीने चोप दिला होता. ज्याची चर्चा राज्यभर होताना दिसली.

ही चर्चा सुरू असतानाच आता पुन्हा एकदा खेड चर्चेत आले आहे. येथील चांडोलीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आणखी एक 'कॅप्टन खरात' सापडल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर शिवदत्त आश्रमातील नवनाथ गवळी नावाच्या भोंदू बाबाचा खरा चेहरा आता चव्हाट्यावर आला आहे. या भोंदूने महिलांच्या अगतिकतेचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत त्यांना जाळ्यात ओढल्याचे आता समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीणमधील खेड तालुक्यातील चांडोली येथील शिवदत्त आश्रमात 'महाराज' म्हणून नवनाथ गवळी राहत आहे. पण आता हा महाराज नसून प्रत्यक्षात वासनांध भोंदू असल्याचे एका ३४ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीमुळे समोर आले आहे. या महिलेने दिलेल्या आपल्या तक्रारीत मे २०२५ पासून पीडिता आपल्या कुटुंबासह आश्रमात दर्शनासाठी जात होती. यावेळी भोंदूबाबा गवळी याने १७ जुलै २०२५ रोजी पहाटे जप करत असताना पीडितेचा विनयभंग केला. तसेच तुझ्या अंगातील दोष दूर करण्यासाठी शारीरिक संबंध ठेवावे लागतील, असे सांगितले.

Like Ashok Kharat bhondu baba
Ashok Kharat Case: साई संस्थान कर्मचाऱ्यानं जीवन संपवलं! खरातचं नाव चार्जशीटमधून वगळलं; शिर्डी पोलिसांच्या अडचणीत वाढ

यावेळी कुटुंबाची भीती आणि सामाजिक प्रतिष्ठेपोटी महिलेने सुरुवातीला संपूर्ण माहिती लपवत फक्त विनयभंगाची तक्रार दिली होती. त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. पण आता 'खरात' प्रकरणामुळे पीडिता समोर आली आहे. तसेच भोंदूबाबा गवळीकडून सतत होणारा त्रास, फोनवरचे अश्लील वक्तव्याचा भांडा फोड केला आहे. यावेळी आम्ही देवाच्या श्रद्धेने तिथे गेलो होतो, पण या माणसाने अंधश्रद्धेचा बाजार मांडला. अंगात येण्याचे थोतांड रचून त्याने महिलांचे शोषण केले. आता आम्हाला याची भीती वाटतेय, अशी कैफियत मांडली आहे.

दरम्यान आता पीडितेने दिलेल्या माहितीच्या आधारे तपासाला सुरूवात झाली असून या आश्रमात महिलांच्या 'अंगात येण्याचे' प्रकार घडवून आणले जातात. महिलांमध्ये कोणती तरी वेगळी शक्ती असल्याचे भासवून, त्यांच्या मनावर ताबा मिळवला जातो आणि मग 'दोष निवारण' करण्याच्या नावाखाली त्यांचे लैंगिक शोषण केले जात असल्याचे समोर आले आहे. पण पोलिसांनी गुन्हा दाखल करूनही गवळी अद्याप मोकाट असून न्यायालयात एकाही तारखेला हजर झालेला नाही. तो बाहेर असल्यानेच पीडितेचे कुटुंब सध्या प्रचंड दहशतीखाली आहे.

Like Ashok Kharat bhondu baba
Ashok Kharat case : अशोक खरातच्या जीवाला धोका? SIT ॲक्शन मोडमध्ये अन् कोर्टानेही दिली परवानगी

FAQs :

1. हे प्रकरण कुठे घडले आहे?
हे प्रकरण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चांडोली येथे घडले आहे.

2. आरोपी कोण आहे?
नवनाथ गवळी नावाचा भोंदूबाबा आरोपी आहे.

3. या प्रकरणाचा नाशिकशी काय संबंध आहे?
नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानंतर अशा घटनांकडे अधिक लक्ष वेधले गेले.

4. आरोपीवर कोणते आरोप आहेत?
महिलांना फसवून लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत.

5. या घटनेनंतर काय परिणाम होऊ शकतो?
अंधश्रद्धेविरोधात जनजागृती वाढून अशा घटनांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com