Ritesh Kumar and Vinay Kumar  Sarkarnama
पुणे

Mcoca Act : पुण्याच्या रितेश कुमारांचं `मोक्का`चं शतक तर पिंपरी-चिंचवडच्या विनयकुमार चौबेंचं अर्धशतक, तरीही...

Ritesh Kumar and Vinay Kumar : वर्ष 2022 मध्ये या दोघांनीही जवळपास सोबतच शहरांच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता.

उत्तम कुटे: सरकारनामा

Pune and Pimpri -Chinchwad Police News : पुणे पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी सरत्या २०२३ वर्षात सराईत गुंडटोळ्यांना मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९) लावण्याच्या केसेसचे शतक (107) ठोकले.

त्याचा तडाखा शंभर गुंड टोळ्यांतील साडेसहाशेवर सराईत गुन्हेगारांना बसला. तर, मागील वर्षातच पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी `मोक्का` कारवाईचे अर्धशतक मारले. तरी या दोन्ही जुळ्या शहरातील गुन्हेगारी काही नियंत्रणात आलेली नाही.

पुणे पोलीस(Pune Police) आयुक्त म्हणून रितेश कुमार यांनी 16 डिसेंबर 2022 रोजी पदभार घेतला.त्यानंतर वर्षभरात त्यांनी शंभरावर गुंड टोळ्यांना मोक्काचा तडाखा दिला. तर, त्यांच्याअगोदर दोन दिवस (14 डिसेंबर 2022) पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून विनयकुमार चौबे रुजू झाले. त्यांनी गेल्या वर्षभरात पन्नास मोक्काच्या केसेस केल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, हा दीडशतकी मोक्काचा तडाखा देऊनही दोन्ही शहरातील गुन्हेगारी म्हणावी अशी आटोक्यात आलेली नाही. गंभीर गुन्हे घडतच आहेत. सायबर क्राईम(Cybercrime) पोलिसांची मोठी डोकेदुखी झाली आहे. या गुन्ह्यांचा शोध लागण्याचे प्रमाण कमी असल्याने पोलिसांची चिंता वाढलेली आहे.

चौबे यांनी, तर एका महिन्यात (डिसेंबर) 12 टोळ्यांतील साठ सराईत गु्न्हेगारांना मोक्का लावला. तर, गेल्या वर्षभरात त्यांनी 51 गुंड टोळ्यांच्या 357 गुंडांना या कायद्याचा बडगा दिला. तरीही शहरातील गुन्हेगारी अपेक्षेनुसार नियंत्रणात आलेली नाही.

दोन दिवसापूर्वीच हिंजवडी आणि तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन खूनी हल्ले झाले. त्याजोडीने फसवणूक,चेनस्नॅनिंग, लुटमारीचे गुन्हेही घडतच आहेत. त्यातून दोन्ही पोलीस आयुक्तांचा मोक्काचा उतारा फेल गेल्याचे दिसून येत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT