Rahul Gandhi Pune Event.jpg Sarkarnama
पुणे

Rahul Gandhi News: राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमस्थळी तासभर मेट्रो बंद; काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

Pune Chhatron Ki Goonj News: कोटा, डेहराडून आणि प्रयागराजनंतर राहुल गांधींचा ‘छात्रों की गूंज’ हा उपक्रम पुण्यात दाखल झाला. शनिवारी(ता.22 ऑगस्ट) पुण्यात झालेल्या या कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत तरुणाई, महिला स्वातंत्र्य, समान संधी आणि देशाच्या भवितव्यावर भाष्य केले.

Sudesh Mitkar

Pune News : कोटा, डेहराडून आणि प्रयागराजनंतर राहुल गांधींचा ‘छात्रों की गूंज’ हा उपक्रम पुण्यात दाखल झाला. शनिवारी(ता.22 ऑगस्ट) पुण्यात झालेल्या या कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत तरुणाई, महिला स्वातंत्र्य, समान संधी आणि देशाच्या भवितव्यावर भाष्य केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण आज राजकारणावर चर्चा करणार नसल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मेट्रो बराच वेळ एकाच ठिकाणी उभी असल्याचे निदर्शनास आले. यावरून काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मेट्रो सेवा जाणीवपूर्वक थांबवण्यात आल्याचा आरोप केला आहे.

प्रशांत जगताप यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "नीट बघा... हा आहे भाजपाचा रडीचा डाव, ही आहे घाबरलेली भाजपा!"

"जननायक राहुल गांधी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची शक्ती पुण्यात एकत्र आली आहे. 'छात्रों की गूंज' या कार्यक्रमाच्या प्रचंड यशाने भाजपाच्या सत्तेची खुर्ची हादरली आहे. यामुळे बहुदा सत्ताधाऱ्यांचे मानसिक संतुलनही बिघडले आहे," असा दावा जगताप यांनी केला.

पुढे त्यांनी पुणे मेट्रोवरून भाजपला लक्ष्य केले. "ज्या मेट्रोचा भाजपकडून प्रचंड गाजावाजा केला जातो, ज्याच्या प्रत्येक टप्प्याच्या उद्घाटनासाठी स्वतः नरेंद्र मोदींना यावे लागते, ती पुणे मेट्रो गेल्या १ तासापासून बरोबर सभास्थळाच्या समोर, एकाच ठिकाणी बंद ठेवण्यात आली आहे," असे जगताप यांनी म्हटले आहे.

तसेच, "ही मेट्रो बंद ठेवल्याने कित्येक मेट्रो स्टेशन्समध्ये नागरिक ताटकळत उभे असतील याची कल्पनाही न केलेली बरी," असा आरोपही त्यांनी केला.

"‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला येण्यासाठी या मेट्रोचा वापर नागरिकांनी करू नये, सभेला पोहोचण्यासाठी नागरिकांना त्रास व्हावा म्हणून सत्ताधारी भाजपाने केलेले हे कृत्य हास्यास्पद आहे," असा थेट आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे.

याचदरम्यान, मेट्रो सेवा नेमकी कोणत्या कारणामुळे थांबवण्यात आली होती आणि त्यामागे सुरक्षा व्यवस्था होती की अन्य काही कारण, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या या आरोपावर आता महा मेट्रो आणि भाजपकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT