Rahul Kul Vs Ramesh Thorat  sarkarnama
पुणे

Rahul Kul Vs Ramesh Thorat : राहुल कुल-रमेश थोरातांमध्ये तू तू मै मै, आप्पांची क्लिप भरसभेत ऐकवली!

Bhima Patas Sugar Factory Rahul Kul Ramesh Thorat : रमेश थोरांची क्लिप राहुल कुल यांनी भिमा पाटस सहकारी कारखान्याच्या सभेत ऐकवली. त्यानंतर थोरात-कुल यांच्या तू तू मै मै झाली.

Roshan More

Daund Politics : दौंड तालुक्याच्या राजकारणात आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. मात्र, रमेश थोरात हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आणि राहुल कूल हे भाजपमध्ये असल्याने दोघे देखील महायुतीचाच भाग आहेत. दरम्यान, भिमा पाटस साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दोघे एकाच व्यासपीठावर आले होते. पहिल्यांदाच शांततेत पडलेल्या या सभेत थोरात-कूल यांच्यात तू तू मै मै झाली. कूल यांनी थोरांचा क्लिपच माईकवरून ऐकवली.

राहुल कुल यांनी प्रस्ताविक करताना कारखान्याचा लिलाव पुणे जिल्हा बँकेने केला, असे म्हटले होते. त्याला थोरात यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यानंतर कुल यांनी थोरात यांची जुने क्लीपच ऐकवली.

त्या क्लिपमध्ये 'कारखाना जप्त करण्याचे अधिकार आम्हाला मिळाले आहेत. कारखाना आणि येथील जमीन आम्ही जप्त करणार.', असे वक्तव्य थोरातांचे होते. कुल यांनी माईकवरून ही क्लिप सभासदांना ऐकवली.

यावर थोरात यांनी जप्तीची कारवाई ही राज्य सहकारी बँकेने केल्याचे म्हटले. त्याला कुल यांनी प्रत्युत्तर देत जप्तीची नोटीस व ताबा जिल्हा बँकेने घेतला आहे. सोमवारी कागदपत्र जिल्हा बँकेत सादर करतो, असे सांगितले. त्यावर सोमवारी या कागदपत्र तपासू, असे थोरातांनी सांगितले.

कामगारांची देणी देणार

राहुल कुल यांनी म्हटले की,काही अतातायी कामगारांमुळे पाच कोटींची थकीत देणी लांबली आहे. ती न्यायप्रविष्ट आहे. मात्र, सर्व कामागरांची देणी देण्यास आम्ही बांधील आहोत. शेतकऱ्यांची दिवाशी गोड करणार असून यापूर्वी प्रतिटन 200 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT