Eknath Shinde VS BJP : एकनाथ शिंदेंच्या विरोधात भाजपमध्ये नाराजी, मुख्यमंत्री फडणवीसांकडे करणार तक्रार! नवी मुंबईच्या राजकारणात मोठा ट्विस्ट

Eknath Shinde Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाला आहे. भाजपच्या माजी नगरसेवकांच्या कामांना शिंदे ब्रेक लावत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Navi Mumbai Politics : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी भाजपमध्ये नाराजी असल्याचे समोर आले आहे. नवी मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेवकांनी थेट वर्षावर जाऊन एकनाथ शिंदेंची तक्रार करणार असल्याचे संकेत दिले आहेत. एकनाथ शिंदेंसोबत आगामी महापालिका निवडणुकीत युती नको, असे सांगत भाजपने नवी मुंबई महापालिका स्वबळावर लढावी, असा आग्रह नवी मुंबई भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी धरला आहे.

मंत्री गणेश नाईक यांनी नुकतीच भाजपच्या माजी नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या विरोधात सूर आळवण्यात आला. शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री असल्याने भाजपच्या माजी नगरसेवकांच्या कामांना ब्रेकल लावत आहे, असा आरोप करण्यात आला.

संजीव नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे माजी नगरसेवक मोर्चा देखील काढणार आहेत. तसेच आगामी आठ दिवसांत वर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत. नवी मुंबईत शिंदेंसोबत युती नको, असे सांगणार आहे. तसेच ते कामांना ब्रेक लावत असल्याबाबतची तक्रार देखील करणार आहेत.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Gangster Nilesh Ghaiwal: कुख्यात गुंड निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून देणारा 'आका' कोण ? नगर अन् पुण्यावर संशयाची सुई

गणेश नाईक 'अॅक्शन मोड'वर

मंत्री गणेश नाईक हे देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी ठाण्यामधील पक्षाच्या बैठकीत त्यांनी रावणाचा अहंकार जाळला पाहिजे, असे म्हणत अप्रत्यक्ष शिंदेंना टार्गेट केले. तसेच नवी मुंबईत आपण स्वबळावर सत्ता आणली तशी येथे देखील आणू, असे आव्हान दिले होते.

एकनाथ शिंदे लागले कामाला

नवी मुंबईमध्ये भाजपने स्वबळाच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. गणेश नाईकांच्या विरोधात शिवसेनेने देखील दंड थोपटले आहेत. आगामी निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेता नवी मुंबईत एकनाथ शिंदेंनी लक्ष घातले असून त्यांनी शनिवारी (ता.27) नवी मुंबईत पक्षाचा मेळावा घेत निवडणुकीच्या तयारीला वेग दिला.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Congress Election Strategy: सतेज पाटील अन् प्रणिती शिंदेंनी सांगितला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जिंकण्याचा 'हा' फॉर्म्युला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com