BJP Activist's join NCP Sarkarnama
पुणे

राहुल कुल यांना धक्का : दोन पिढ्यांपासून निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

स्थानिक कार्यकर्त्यांच्या कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून साथ सोडली

सावता नवले

कुरकुंभ (जि. पुणे) : भारतीय जनता पक्षाचे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या कुटुंबीयांशी गेल्या दोन पिढ्यांपासून निष्ठावंत असलेले दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील मळद येथील कार्यकर्त्यांनी उसाचा प्रश्नमार्गी लागावा. तसेच, स्थानिक पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून माजी आमदार तथा पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश भाजपचे आमदार कुल व पक्षाचे नवनिर्वाचित युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बापूराव भागवत यांना धक्का मानला जात आहे. (Rahul Kul's loyal activists join NCP)

मळद येथील विविध विकासकामांचे लोकार्पण माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात कुल कुटुबीयांशी दोन पिढ्यांपासून एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामध्ये हनुमंत घागरे, मल्हारी खटके, पोपट घागरे, मधुकर घागरे, दत्तात्रेय खटके, महेश घागरे, संतोष घागरे आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

मळद ग्रामपंचायतीवरील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून भाजपची सत्ता आणण्यात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा होता. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा पक्षात योग्य सन्मान, ऊस गाळप व इतर अडचणी सोडविल्यास जातील, असे आश्वासन माजी आमदार रमेश थोरात, वीरधवल जगदाळे, अप्पासाहेब पवार यांनी दिले. या प्रसंगी माजी उपसभापती उत्तम आटोळे, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय दगडू शेलार, रिपब्लिकन सेनेचे राहुल भालेराव, गजानन गुणवरे, राहुल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी सरपंच दत्तात्रेय बाळू शेलार यांनी केले.

कुल गटही लागला कामाला

राष्ट्रवादीत झालेल्या पक्ष प्रवेशाचे उटे काढण्यासाठी भाजपचे नेते व स्थानिक कार्यकर्ते कामाला लागले आहेत. आमदार राहुल कुल, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुल ह्या स्थानिक कार्यकर्त्यांना घेऊन विरोधी गटातील काहींच्या भेटी घेऊन प्रयत्न करीत आहेत. प्रवेश करणारांमध्ये अडचणीच्या काळात कार्यकर्त्यांना मदत न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या तालुका व स्थानिक पातळीवरील नेतृत्वाला कंटाळून एक निष्ठवान गट भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT