पोटनिवडणूकीसाठी भाजपकडे १२ इच्छूक; ४ ऑक्टोबरला होणार उमेदवाराची घोषणा

(Deglur-Biloli By Election)देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूकीसाठी (Bjp) भाजपकडून लढणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
Bjp State President Chandrkant Patil
Bjp State President Chandrkant PatilSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद ः देगलूर-बिलोली विधासनभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर आता महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.

पंढरपूर पोटनिवडणूकीत भाजपने बाजी मारली असली तरी त्यानंतर झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत भाजपला सपाटून मार खावा लागला होता. असे असले तरी देगलूर-बिलोली पोटनिवडणूक लढवण्यासाठी भाजपकडे इच्छूकांची चांगलीच गर्दी झाली आहे.

भाजपकडे १२ जणांची यादी असून या पैकी एका नावावर ४ आॅक्टोबरला आपण देगलूर येथेच शिक्कामोर्तब करणार आहोत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने नुकतीच भाजपची एक बैठक पार पडली.

त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना चंद्रकांत पाटील म्हणाले, देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूकीसाठी भाजपकडून लढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सध्या माझ्याकडे १२ जणांची नावे आहेत. ४ तारखेला मी देगलूरला जाणार आहे, तिथेच यापैकी एका नावाची घोषणा केली जाईल. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील २ आॅक्टोबरला या मतदारसंघाचा दौरा करणार आहेत.

राज्यातील ओबीसींचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारने मागसवर्ग आयोगाची स्थापना करून इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचा मुद्दा उपस्थित करून पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. मराठा समाजाच आरक्षण याच सरकरमुळे गेलं,आताही तेच सुरू आहे. इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचं काम केलं जातं नाहीये.

Bjp State President Chandrkant Patil
पूरात वाहून गेलेल्या तरुणाच्या कुंटुंबियांना भेटायला कलेक्टर ट्रॅक्टरच्या ट्रॉलित बसून गेले

मनसे सोबतची युती संदर्भात विचारले असता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माझी भेट अचानक झालेली आहे. एखाद्या ठिकाणी आवश्यकतेनुसार युती होत असते. राष्ट्रीय पातळीवर युती व्हायला वरिष्ठ नेते चर्चा करतील, असे सांगत त्यांनी मनसे-भाजप युतीचे संकेत दिले.

पालघरमध्ये स्थानिक पातळीवर युतीची गरज असेल तर ती केली जाईल, असे स्पष्ट करतांनाच राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कसले करता, शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करा, अशी मागणी देखील पाटील यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com