Raj Thackeray Pune Rally News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये कोथरूड आणि कसबा विधानसभा मतदारसंघातील मनसे उमेदवारांसाठी शनिवारी जाहीर सभा घेतल्या. यावेळी त्यांनी आरक्षण आणि जातीच्या राजकारणाच्या मुद्द्याला हात घालत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.
कोथरूड मधील सभेला संबोधित करताना राज ठाकरे(Raj Thackeray) म्हणाले, 'ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. ही निवडणूक महाराष्ट्राचे भविष्य सांगणारी आहे. महाराष्ट्र यापुढे कोणत्या देशाने जाणार आहे हे सांगणारी ही निवडणूक आहे. सध्या सगळ्या गोष्टी जातीपाती मध्ये बघण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राची घाण करून ठेवली आहे. अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य घडवणाऱ्या महाराजांचा महाराष्ट्र आत जातीपातीमध्ये वाटला गेला आहे.'
याचबरोबर, 'स्वतःच्या जातीबद्दल सगळ्यालाच प्रेम आहे. मात्र दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या(NCP) जन्मानंतर सुरू झाला आहे.पहिल्यांदा मराठा आणि ब्राह्मण चढाओढ लावून दिली आता मराठा आणि ओबीसी लावून दिली असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. तसेच जेम्स लेनच पुस्तक आलं त्यावेळेस पहिली पत्रकार परिषद गजानन महिंदळे आणि बाबासाहेब पुरंदरे यांनी घेतली. हे पुस्तक पहिलं बॅन करा हे बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितलं. नंतर भांडारकर इन्स्टिट्यूट फोडली हे सगळं शरद पवारांचं राजकारण आहे. सगळं जातीचं राजकारण शरद पवारांचं आहे. यांनी फक्त मतभेद नाही तर मनभेद पण करून टाकले.'
याशिवाय 'मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange) जेव्हा उपोषणाला बसले होते. तेव्हा मी त्यांच्यासमोर त्यांना सांगितलं होतं. तुम्ही जी मागणी करत आहात ती तांत्रिकदृष्ट्या होऊ शकत नाही. हे सगळे राजकारणी तुम्हाला फसवत आहेत चुकीचं सांगत आहेत. आरक्षणामध्येच फक्त सरकारी नोकरी उपलब्ध होतात पण सरकारी नोकरी आता संपल्या आहेति. किती सरकारी शिक्षण संस्था उरल्या आहेत. सगळ्या शिक्षण संस्था या खासगी झाल्या आहेत. खासगी शिक्षण संस्थेत आरक्षण नाही. शिक्षण आणि नोकऱ्या कधी आरक्षणातून मिळणार आहेत. याचा एकदा तरी विचार करा.' असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकारे पुढे म्हणाले, 'आपण लहानपणी प्रतिज्ञा कशासाठी शिकतो? सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा कशासाठी शिकतो, फाडून टाका ती प्रतिज्ञा. एका जातीच्या खानावळीत दुसरे माणसं जात नाहीत काय चाललं आहे. सगळ्या महाराष्ट्राचे व्याकरण बिघडलं आहे ते सुधरवण्याची संधी द्या.'
(Edited by - Mayur Ratnapakhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.