Raj Thackeray Speech Sarkarnama
पुणे

Raj Thackeray Speech: मनसेच्या 'ब्लू प्रिंट'वरून टीका करणाऱ्यांना राज ठाकरेंनी सुनावले खडेबोल

Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवड 'एडिटर्स गिल्ड'च्या पत्रकार हल्लाविरोधी परिषदेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते.

सरकारनामा ब्यूरो

Pimpri News : पिंपरी-चिंचवड 'एडिटर्स गिल्ड'च्या पत्रकार हल्लाविरोधी परिषदेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या महाराष्ट्राच्य़ा 'ब्लू प्रिंट'वरून त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले.

नऊ मार्च २००६ ला राज यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही नवी संघटना तथा राजकीय पक्ष स्थापन केला. त्यानंतर दहाच दिवसांनी मुंबईत शिवाजी पार्क मैदान, दादर (पश्चिम) येथे घेतलेल्या जाहीर सभेत महाराष्ट्राचा विकास आराखडा तथा 'ब्लू प्रिंट' आणणार असल्याचे जाहीर केले.

मात्र, त्यानंतर ती 'ब्लू प्रिंट' जवळजवळ आठ वर्षानी २०१४ ला आली. पण, तोपर्यंत ते त्यावरुन टीकेचे धनी झाले होते. कुठे आहे, तुमची ब्लू प्रिंट अशी वारंवार विचारणा त्यांना करण्यात येत होती. त्याची सव्याज परतफेड त्यांनी आज उद्योगनगरीत केली.

मीडियाच्याच पुरस्कार वितरण सोहळा आणि पत्रकार हल्लाविरोधी परिषदेत त्यांनी मीडियालाच सुनावले. सुपाऱ्या आणि पाकिटं घेऊन आपल्याला २००६ ते २०१४ पर्यंत ही 'ब्लू प्रिंट' येईपर्यंत हिणवले गेले होते. याची कटू आठवण त्यांनी सांगितली. मोठे कुत्सित टोमणे त्या कालावधीत ऐकावे लागले, असे ते म्हणाले.

दरम्यान, मोठा अभ्यास आणि संशोधन करून २०१४ ला आणलेल्या या 'ब्लू प्रिंट'वर आतापर्यंत मीडियाने काहीच विचारलेले नाही, याबद्दल राज यांनी आज सखेद आश्चर्य व्यक्त केले. त्यात मीडियाला इंटरेस्ट नसल्य़ाने त्यांनी ती वाचलीच नाही, असा टोलाही त्यांनी मारला.

राज्यातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे या 'ब्लू प्रिंट'मध्ये आहेत. ती बनविणारा देशाच्या राजकीय इतिहासातील मनसे हा पहिलाच पक्ष होता, असा अभिमानपूर्वक उल्लेख त्यांनी केला. प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते, असे ते म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT