BJP MLA Will Split : काँग्रेस भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत; १५ ते २० आजी-माजी आमदार फुटणार?

Karnataka News : सोमशेखर यांच्याबरोबरच माजी मंत्री के. सी. नारायणगौडा, माजी मंत्री शिवराम हेब्बार आणि भैरती बसवराजही काँग्रेसच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Siddaramaiah-Dk Shivakumar-BJP
Siddaramaiah-Dk Shivakumar-BJPSarkarnama

Bangalore News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस भारतीय जनता पक्ष आणि जनता दलाला (धर्मनिरपेक्ष) कर्नाटकात मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. सुमारे १५ ते २० आमदार काँग्रेसने गळाला लावले असून या आमदारांचा काँग्रेसमध्ये लवकरच प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, काँग्रेसचा डाव उघड होताच भाजपही गळती रोखण्यासाठी कामाला लागला आहे. त्यांना यामध्ये किती यश येते, हे पाहावे लागेल. (15 to 20 current and former MLAs of BJP and JDS in Karnataka are on the way to Congress)

भाजप आणि धजदच्या अनेक विद्यमान व माजी आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताला काँग्रेस नेते तथा कॅबिनेट मंत्री चेलुवरायस्वामी यांनी दुजोरा दिला आहे. येत्या काही दिवसांत १५ ते २० आजी-माजी आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. ते आमदार कोण आहेत, हे येत्या काही दिवसांत समजेल.

Siddaramaiah-Dk Shivakumar-BJP
Kolhapur Politics : 'शाहू महाराजांबद्दल आदरच; पण...' ; लोकसभा उमेदवारीच्या चर्चेवर सतेज पाटलांची प्रतिक्रिया

विरोधी पक्षातील आमदारांना गळाला लावण्याचे काम कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार करत असल्याचे पुढे येत आहे. त्यांचे पहिले लक्ष्य हे यशवंतपूरचे भाजपचे आमदार एस. टी. सोमशेखर आहेत. कारण सोमशेखर यांनी नुकतीच समर्थकांची बैठक घेतली, त्यात कार्यकर्त्यांनी सोमशेखर यांना ‘ग्रँड ओल्ड पार्टी’मध्ये सामील व्हावे, यासाठी सुचविले आहे. विशेष म्हणजे त्या बैठकीला नेलमंगलचे काँग्रेसचे आमदार श्रीनिवास उपस्थित होते. त्यांनी ‘सोमशेखर काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे,’ असे स्पष्ट केले.

Siddaramaiah-Dk Shivakumar-BJP
Sharad Pawar Kolhapur Sabha : पवारांच्या कोल्हापुरातील सभेचे अध्यक्ष शाहू महाराज म्हणाले, ‘खासदार व्हावं, अशी माझी पूर्वी इच्छा होती’

दरम्यान, सोमशेखर प्रवेश रोखण्यासाठी भाजपचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील, माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि ज्येष्ठ नेते सी. टी. रवी हे कामाला लागले आहेत. त्यांनी तातडीने सोमशेखर यांना फोन करत स्थानिक भाजप नेत्यांच्या काही भागासह त्यांच्या समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले. सोमशेखर यांची माजी केंद्रीय मंत्री डी. व्ही. सदानंदगौडा यांनीही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे.

Siddaramaiah-Dk Shivakumar-BJP
Amarsinh Pandit Emotional Post : पवारांच्या टीकेनंतर अमरसिंह पंडितांची भावनिक पोस्ट; ‘श्रद्धेय साहेब, मी स्वप्नातही तसा विचार करू शकत नाही’

विधानसभा निवडणुकीत सोमशेखर यांना पराभूत करण्यासाठी भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी जेडीएसला मदत केली होती. त्यामुळे सोमशेखर हे भाजपच्या स्थानिक नेत्यांवर नाराज आहेत. त्यातूनच ते काँग्रेस प्रवेशाचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोमशेखर आणि त्यांच्या समर्थकांना काँग्रेसमध्ये आणण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी माझ्यावर सोपवली आहे.

Siddaramaiah-Dk Shivakumar-BJP
Vijay Wadettiwar Big Statement : सप्टेंबरमध्ये राज्यातील ‘मुख्य’ खुर्ची बदलणार; वडेट्टीवारांच्या दाव्याने पुन्हा खळबळ

...म्हणून सिद्धरामय्यांनी हायकमांडला दिला २० जागा जिंकण्याचा शब्द

सोमशेखर यांच्याबरोबरच माजी मंत्री के. सी. नारायणगौडा, माजी मंत्री शिवराम हेब्बार आणि भैरती बसवराजही काँग्रेसच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कर्नाटकातील या संभाव्य राजकीय बदलामुळेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काँग्रेस हायकमांडला राज्यातील लोकसभेच्या २८ पैकी २० जागा जिंकण्याचा शब्द दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com