Dada Bhuse and Aaditya Thackeray Meet: शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे अन् आदित्य ठाकरेंची गुप्त भेट ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Political News: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचाली सुरू असल्याची चर्चा
Dada Bhuse and Aaditya Thackeray
Dada Bhuse and Aaditya Thackeray Sarkarnama

Nashik News: शिंदे गटाचे नेते, मंत्री दादा भुसे आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यात गुप्त भेट झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. नाशिकमध्ये दादा भुसे आणि आदित्य ठाकरे यांची गुप्त भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर रोडवरील एका खासगी रिसॉर्टवर ही भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या गुप्त भेटीमुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले होते, यातच आता मंत्री दादा भुसे आणि आदित्य ठाकरे यांच्या गुप्त भेटीच्या चर्चा आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकी काय शिजतंय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Dada Bhuse and Aaditya Thackeray
Satara Loksabha News : सातारा लोकसभेसाठी ठाकरे गट आग्रही; शरद पवार मतदारसंघ सोडणार का..

आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी दादा भुसे हे नियोजित कार्यक्रमातून अचानक बाहेर पडल्याचे बोलले जात आहे. एवढंच नाही तर भुसेंनी प्रशासकीय प्रोटोकॉल बाजूला ठेवत रिसॉर्ट गाठत ही भेट घेल्याची चर्चा आहे. ज्या ठिकाणी भेट झाली हे रिसॉर्ट बेजे गावातील असल्याचे बोलले जात आहे.

Dada Bhuse and Aaditya Thackeray
Badamrao Pandit News: जो कोणी काम करणार नाही त्याला बुटाने मारुन हाकलणार : माजी मंत्री पंडितांचा व्हिडिओ व्हायरल

आदित्य ठाकरे हे स्वतः गाडी चालवत नाशिकला खासगी दौऱ्यावर आल्याचे बोलले जात असून आदित्य ठाकरे आणि दादा भुसे यांच्या भेटीची मोठी गुप्तता पाळण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या भेटीबाबतचे वृत्त दादा भुसे यांनी फेटाळून लावले असून अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com