Ekanath shinde, ramesh konde  Sarkarnama
पुणे

Shivsena News : ठाकरेंची साथ सोडलेल्या रमेशबापूंना दीड वर्षानंतर मिळाले मनातले 'हे' पद

सरकारनामा ब्युरो

राजेंद्रकृष्ण कापसे

Pune News : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्यानंतर ठाकरे गटासोबत असलेल्या रमेश कोंडेंनी अखेर त्यांची साथ सोडत शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला. त्यानंतर त्यांची शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी वर्णी लागली. विशेष म्हणजे गेल्या दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर रमेश कोंडे यांची पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. हेच पद मिळावे, यासाठी दीड वर्षांपूर्वी रमेशबापूंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला होता. सुमारे दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर त्यांना हवे असलेले मनातील ‘पीएमआरडीए'चे सदस्यपद मिळाले आहे.

मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची पुण्यात दमदार एन्ट्री झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांची पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या सदस्यपदी नियुक्ती झाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचा नगरविकास विभाग आहे. पीएमआरडीएच्या माध्यमातून तसेच, नगरविकास विभागामार्फात दोन्ही महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सुमारे ५५० ग्रामपंचायती दोन रिंग रोड, विमानतळ, समाविष्ट ३४ गावांचा विकास, शहरालगत असणाऱ्या गावातील बांधकामांचा विषय यांच्यामार्फत पक्ष पोहोचण्यासाठी या निवडीचा फायदा होईल. तसेच आता 'पीएमआरडीए’च्या विकास आराखड्याला मंजुरी मिळण्याची प्रक्रिया सुरू होईल.

पुणे महानगर क्षेत्राच्या विकासासाठी ‘पीएमआरडीए’च्या अंतर्गत सुमारे ७३ लाख लोकसंख्या आहे. पुणे महानगर क्षेत्र राज्यातील सर्वात मोठे ठरलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या महायुतीने संभाव्य लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पक्ष-संघटनेला बळ देण्यासाठी आता आपल्या पक्षाचे पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांच्या विविध महामंडळे आणि संस्थांवर नियुक्त्या करण्यावर भर दिलेला आहे. त्यातील ही पहिली नियुक्ती मानली गेली.

एकनाथ शिंदे यांना सर्वप्रथम दिले होते समर्थन...

शिवसेना पक्ष-संघटनेतील अंतर्गत बंडाळीच्या काळात शिवसेनेचा जिल्ह्यातून पहिला जिल्हाप्रमुख म्हणून रमेश कोंडे (Ramesh Konde) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वप्रथम समर्थन दिलेले होते. मुख्यमंत्री शिंदे (Eknath shinde) यांचे निकटवर्तीय म्हणून रमेश कोंडे सुरुवातीपासून ओळखले जात होते. त्यामुळे त्यांनादेखील एखादे महत्त्वाचे पद मिळणार हे अपेक्षितच होते. नवनियुक्त सदस्य रमेश कोंडे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिक आणि सदनिकाधारकांना मोठा आधार मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मिळकतदारांना मिळवून दिला न्याय

ठाकरे सरकारच्या काळातदेखील खडकवासला मतदारसंघातील असंख्य शेतकरी, बांधकाम व्यावसायिक आणि मध्यमवर्गीय मिळकतदारांना कोंडे यांच्या माध्यमातून न्याय मिळाला होता. आक्रमक पदाधिकारी अशी रमेश कोंडे यांची ओळख आहे. ते खेड-शिवापूरचे माजी सरपंच होते. कोंडे २००७ ते २०१२ दरम्यान खडकवासला मतदारसंघातील खेड-शिवापूर खानापूर गटाचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत.

दरम्यान, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची राजकीय व सामाजिक क्षेत्रातील वाटचाल सध्या सुरू आहे. रमेश कोंडे यांच्या निवडीमुळे खडकवासला मतदारसंघातील नागरिक व कार्यकर्ते आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.

(Edited by Sachin Waghmare)

R...

SCROLL FOR NEXT