Satara Loksabha : माढा, साताऱ्यात महायुतीचाच खासदार...! घटकपक्षांनी बांधली मोट...

Mahayuti Meeting : महायुतीच्या बैठकीत संकल्प; गांधी मैदानावरून लोकसभेचे रणशिंग फुंकणार.
Mahayuti Meeting
Mahayuti MeetingSarkarnama
Published on
Updated on

Satara Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील महायुतीतील घटकपक्षांनी मोट बांधली असून लोकसभेसाठी माढा व सातारा मतदारसंघातील उमेदवार कोण, जागा कोणाला हा विषय राज्याच्या नेतृत्वाचा आहे. जो उमेदवार दिला जाईल, त्याला सर्वाधिक मतांनी निवडून आणण्याचा संकल्प आज महायुतीच्या बैठकीत करण्यात आला. येत्या रविवारी गांधी मैदानावर मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या महामेळाव्यात लोकसभेचे रणशिंग फुंकण्यात येणार असल्याचे महायुतीच्या नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकारपरिषदेस पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, महेश शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, चंद्रकांत जाधव, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, डाॅ. दिलीप येळगावकर, भाजपचे सातारा लोकसभा संघटक सुनील काटकर, रयत क्रांतीचे सचिन नलवडे, डॉ. प्रिया शिंदे, रिपब्लिकन पक्षाचे अशोक गायकवाड उपस्थित होते.

Mahayuti Meeting
Loksabha Election : ...म्हणून धाराशिवमधील राजकीय समीकरणे बदलणार : राणाजगजितसिंह यांचं सूचक विधानं!

2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे '45 प्लस' खासदार निवडून आणून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यात येणार आहे. त्यासाठी सातारा व माढा लोकसभा मतदारसंघात राज्याच्या नेतृत्वाकडून महायुतीतील ज्यांना उमेदवारी दिली जाईल, त्या उमेदवाराला सर्वाधिक मतांनी निवडून आणण्यात येईल. त्यासाठी गांधी मैदानावर येत्या रविवारी महायुतीच्या जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या मेळाव्यातून आम्ही लोकसभेचे रणशिंग फुंकणार आहोत. जिल्ह्यात महायुती ज्या पद्धतीने एकत्र आहे, तशीच ती बूथपातळीवरही एकत्र असल्याचे दाखवून दिले जाणार आहे. महायुतीच्या सरकारने गेल्या पावणेदोन वर्षात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखाही या मेळाव्यात मांडण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत महायुतीचे सातारा व माढ्यातील खासदार निवडून आणण्याचा चंग आम्ही बांधला आहे.

मेळाव्यासाठी गांधी मैदानच का निवडले, याविषयी विचारले असता मंत्री देसाई म्हणाले, अद्याप लोकसभेची हलगी, नगारे वाजायचे आहेत. पण आम्ही महायुतीत जिल्ह्यात एकविचाराने चालत आहोत, हे दाखवून दिले जाणार आहे. युती निवडणुकीपर्यंत टिकणार का, या प्रश्नावर ते म्हणाले, तुम्ही आतापासूनच नकारघंटा कशाला वाजवता? ज्या पक्षाला ही जागा सुटेल त्यांच्या उमेदवारांचे काम आम्ही सर्व जण करणार आहोत.

सध्या विकसित भारत संकल्प यात्रेला काही तालुक्यांत विरोध होत आहे, याविषयी विचारले असता ते म्हणाले, यासाठी काही घटक नकारात्मक दृष्टीने या यात्रेकडे बघत आहेत. त्यांनी नेमका कशासाठी विरोध केला, याचा शोध घेऊन त्यांची समजूत काढू, असे सांगितले.

शिवेंद्रसिंहराजेंच्या चेहऱ्यावर फुलले हास्य...

शिवेंद्रसिंहराजेंच्या मनातील उमेदवार कोण, या प्रश्नावर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी चेहऱ्यावर हास्य आणत उमेदवार कोण, हे राज्यस्तरातील महायुतीचे नेते ठरवतील, असे सांगितले. दोन्ही राजे एकत्र केव्हापासून आले आहेत. या प्रश्नावर मंत्री देसाई म्हणाले, दोन्ही राजे पूर्वीपासून एकत्र आहेत, तुम्हाला ते माहीत नाही, असे सांगितले.

आमदार जयकुमार गोरे म्हणाले, अद्याप कोणताही उमेदवार ठरलेला नाही. त्यामुळे महायुती म्हणून आम्ही सर्वजण एकत्रितपणे काम करीत आहोत. जो उमेदवार दिला जाईल, त्याला सर्वाधिक मतांनी निवडून आणण्याचे काम केले जाईल, त्यामुळे उमेदवार कोण असेल, हा आता विषय नाही.

(Edited by Amol Sutar)

R...

Mahayuti Meeting
Medha kulkarni : मेधा कुलकर्णींची कोथरुडनंतर आता पाषाणमध्ये धाड; नेमकं काय झालं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com