बारामती तालुक्यातील निंबुत येथे सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या निवासस्थानी गुरूवारी रात्री गोळीबार ( Firing ) झाला होता. बैलाच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजित निंबाळकर गंभीर झाले होते. त्यांचा पुण्यातील रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी निंबाळकरांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी वडगाव-निंबाळकर पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे. तर, एकाचा शोध पोलिस घेत आहेत.
'त्या' रात्री काय घडलं होतं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहाजीराव काकडे ( Shahajirao Kakade ) यांचा मुलगा गौतम काकडे ( Gautam Kakade ) आणि फलटण येथील रणजित निंबाळकर यांचा शर्यतीच्या 'सुंदर' नावाच्या बैलाचा देवाण-घेवाणीचा व्यवहार होता. निंबाळकर यांनी गौतम काकडे यांना 'सुंदर' नावाचा बैल 37 लाखांना विक्री केला होता. त्यातील 5 लाख दिले होते, तर उर्वरित रक्कम आणण्यासाठी निंबाळकर हे गुरूवारी ( 27 ) आपली पत्नी अंकित आणि दोन मुलांसमवेत रात्री 11 च्या सुमारास निंबुत येथील गौमत काकडे यांच्या निवासस्थानी गेले होते.
तेव्हा गौतम काकडे यांनी म्हटलं, "तुम्ही संतोष तोडकर यांना मी तुम्हाला पैसे दिले नाहीत, असं का सांगितलं? तुम्ही असं बोलायला नको होते, मी तुम्हाला सकाळी पैसे देतो. तुम्ही आता स्टॅम्प पेपरवर सही करा."
त्यावर निंबाळकरांनी, "तुम्ही माझे राहिलेले पैसे द्या, मी लगेच सही करतो आणि जर तुम्हाला व्यवहार पूर्ण करायचा नसेल तर तुमचे 5 लाख रूपये मी तुम्हाला परत देतो, माझा बैल परत द्या," असं बोलले.
नंतर दोघांत तुझं-माझं झाल्यानं गौतम यांनी आपला भाऊ गौरवला बोलावून घेतलं. त्यावेळी गौरवसह अन्य तीन जण अनोळखी लोक तेथे आले. त्यानंतर वादावादीला सुरूवात झाली. त्यात गौरवनं त्यांच्याकडे असलेल्या पिस्तुलातून रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार केला.
या गोळीबारात निंबाळकर जखमी झाले होते. त्यांच्यावर पुण्यातील रूग्णालयात उपचार सुरू होते. पण, उपचारदरम्यान निंबाळकरांना मृत्यू झाला आहे. पोलिसांनी शहाजीराव काकडे, गौरव काकडे यांना अटक केली आहे. तर बारामती पोलिस गौतम काकडे यांचा शोध घेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.