Rahul Gandhi, Raosaheb Danve Sarkarnama
पुणे

Raosaheb Danve News : विरोधकांच्या बैठकीवर दानवेंची मिश्किल टिपण्णी; म्हणाले, "आता राहुल गांधींचं लवकरच..."

उत्तम कुटे: सरकारनामा

Raosaheb Danve On Rahul Gandhi : लोकसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी देशातील प्रमुख १७ राजकीय पक्षांची शुक्रवारी (ता. २३) पाटणा येथे बैठक झाली. त्यात त्यांनी एकीचा निर्धार केला. या बैठकीती भाजपकडून मात्र खिल्ली उडवली जात आहे. ही बैठक मोदी हटावसाठी नसून कुटुंब बचावासाठी असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यानंतर केद्री रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही या बैठकीवर मिश्किल टिपण्णी केली आहे. (Latest Political Marathi News)

देवाची आळंदी (ता. खेड, जि. पुणे) येथे मोदी @ 9 या उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे शनिवारी (ता. २४) बोलत होते. विरोधकांच्या पाटण्यातील बैठकीनंतरच्या पत्रकापरिषदेत झाली होती. त्यात राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी अविवाहित राहुल गांधी यांना लग्न करण्याचा आग्रह धरला. आम्ही वऱ्हाडी म्हणून तयार असल्याचेही मिश्किलपणे ते म्हणाले होते.

लालू प्रसाद यांच्या वक्तव्याचा धागा पकडून दानवे यांनी आपल्या ग्रामीण भाषेतील शैलीत विरोधकांना फटकारले. दानवे म्हणाले, "मोदी हटवायला पाटण्याची बैठक झाली असे सांगितले जाते. त्यात मात्र राहुल गांधी यांच्या लग्नावर चर्चा झाली त्यामुळे ही बैठक मोदी यांना हटवण्यासाठी होती की राहुल गांधी यांचे लग्न जमविण्साठी होती? विरोधकांची पुढची अशी बैठक सिमला येथे होणार आहे. सिमल्याच्या बैठकीपर्यंत, तरी राहुल यांचे लग्न जमतंय का बघू." दानवे यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांत एकच हशा पिकला.

यावेळी दानवे यांनी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, "राजीव गांधी पंतप्रधान असताना शंभर रुपयांपैकी फक्त १५ रुपये शेतकऱ्यांना मिळत होते. आता ही सर्वच्या सर्व रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत आहे. शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी तरतूद मोदींनी यावर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात केली आहे. मजबूत हातात देश असल्याने जगात भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमाकांवर आहे."

या सभेच्या माध्यामातून शिरूर लोकसभा आणि खेड आळंदी विधानसभेची भाजपने तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. हे दोन्ही मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT