Russia News : रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या विरोधात वॅग्नर गटाचे बंड : सत्तेवरून हटवण्याची वेळ आली म्हणत...

Vladimir Putin news : राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात मोठे बंड झाले आहे
Vladimir Putin News
Vladimir Putin NewsSarkarnama
Published on
Updated on

Rebellion Wagner group in Russia : रशियामध्ये (Russia) अंतर्गत वाद उफाळला आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात मोठे बंड झाले आहे. पुतीन यांचे निकटवर्तीयांमध्ये असलेले येवेनगी प्रिगोझिन यांनी त्यांच्याविरोधात बंड पुकारले. पुतीन यांनी निवडणुकीत गैरप्रकारे सत्ता काबीज केली. त्यांना सत्तेवरून हटवण्याची वेळ आली असल्याचे येवेनगी प्रिगोझिन यांनी म्हटले आहे.

देशाला आता लवकरच नवीन राष्ट्रपती मिळणार असल्याचा दावाही त्यांनी केला. तर, पुतीन (Vladimir Putin) यांनी वॅग्नर गटाचे बंड चिरडून काढणार असल्याचे म्हटले आहे. प्रिगोझिन यांच्या नेतृत्वात 'वॅग्नर' सैन्याने दोन शहरांवर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे. त्याशिवाय, तीन रशियन हेलिकॉप्टर पाडले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच रशियन सैन्याचे काही ठिकाणही ताब्यात घेतली आहेत. वॅग्नर हे प्रिगोझिन यांचे खासगी सैन्य आहे.

Vladimir Putin News
Prakash Ambedkar News : ठाकरेंना त्रास द्यायचाय का? प्रकाश आंबेडकर, दीपक केसरकारांना काय म्हणाले?

वॅगनर गटाने बंडखोरी केल्यानंतर पुतीन यांनी देशाला संबोधित केले. पुतीन म्हणाले, वॅग्नर यांनी वाईट काळात रशियाला धोका दिला. रशियन सैन्यालाही आव्हान दिले. रशियन सैन्याविरोधात शस्त्र उचलणारी प्रत्येक व्यक्ती देशद्रोही आहे. प्रिगोझिनने रशियासोबत गद्दारी केली. रशिया आपल्या भविष्यासाठी लढत असून आमचे प्रत्युत्तर आणखी कठोर होईल, असेही पुतीन यांनी म्हटले आहे.

देशाच्या लष्कराविरोधात शस्त्र उचलणाऱ्यांना कठोर शिक्षा देणार असल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे. संविधान आणि लोकांच्या संरक्षणासाठी जेवढे शक्य होईल, ती पावले उचलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुतीन यांनी आपल्या भाषणात पाश्चिमात्य देशांवर टीका केली. रशियाविरोधात या देशांनी कट आखला असल्याचे आरोपही त्यांनी केले.

Vladimir Putin News
Congress News : भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेसची तयारी; पहिल्यांदाच 400 पेक्षा कमी जागा लढणार?

RIA या वृत्तसंस्थेनुसार, वॅग्नर गटाने केलेल्या बंडामुळे मॉस्को व जवळपासच्या शहरांमध्ये दहशतवाद विरोधी कायदा लागू करण्यात आला आहे. प्रिगोझिन यांनी वॅग्नरचे सैन्य हे युक्रेनची सीमा ओलांडून रशियाच्या शहरात घुसले आहे. रशियन सैन्याच्या दक्षिण मुख्यालयावर नियंत्रण मिळवले असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com