Pune Political News : शांत अशी ओळख असलेल्या कोथरुड भागात गुंड शरद मोहोळ याचा गोळ्या झाडून खून होतो. ही बाब दुर्दैवी असून कोथरुडची ओळख बदलत आहे का, असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी भाजपवर सडकून टीका केली. भाजपने अनेक गुंडांना आश्रय दिल्याचा गंभीर आरोपही धंगेकरांनी केला आहे. यामुळे पुण्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
आमदार धंगेकर यांनी सोमवारी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेतली. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ससूनचे तत्कालिन अधीक्षक डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करावी, यासह इतर काही मागण्या त्यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी धंगेकर (Ravindra Dhangekar) म्हणाले, 'गुंड मोहोळचा भरदिवसा कोथरुड भागात खून झाला. वाढत्या गु्न्हेगारीमुळे कोथरुडची ‘अशांत कोथरुड’ अशी ओळख निर्माण झाली आहे. कोथरुड भागात साहित्यिक, कलावंत वास्तव्यास आहेत. अनेक महत्त्वाच्या संस्था कोथरुड परिसरात आहेत. शिक्षणानिमित्त या भागात विद्यार्थी वास्तव्यास आहेत. अलिकडे मात्र अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळाली आहेत. कोथरुडसह पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करण्याची गरज आहे. त्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत,' अशी मागणी धंगेकरांनी पत्रकारांशी बोलताना केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ससून ड्रग्ज प्रकरणाच्या तपासाबाबतही धंगेकरांनी पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, 'पाटील प्रकरणाचा तपास सुरू आहे की बंद, हे समजत नाही. चौकशीच्या समितीच्या अहवालात ससूनचे तत्कालिन अधीक्षक डॉ. संजीव ठाकूर दोषी आढळले आहेत. मात्र त्यांच्यावर पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यांना सहआरोपी केली नाही. ठाकूरांना अटक व्हायला हवी होती, मात्र ती झालेली नाही. ललितला मदत करणाऱ्या कारागृहातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. या प्रकरणामुळे पुण्याच्या नावलौकिकला बाधा पोहोचली आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई झाली नाही तर आंदोलन करणार,' असा इशाराही धंगेकरांनी दिला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.