Abhijeet Dhoble : भाजपची रणनीती... राखीव मोहोळमधून अभिजित ढोबळेंची चाचपणी ?

Mohol Vidhansabha Constituency : पंचायतराज व ग्रामविकास विभाग मोहोळ विधानसभा संयोजकपदी निवड
Abhijeet Dhoble
Abhijeet DhobleSarkarnama
Published on
Updated on

Solapur Political News : राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेले माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्यापाठोपाठ त्यांचा मुलगा अभिजित ढोबळेंवरही भाजपाने मोठी जबाबदारी दिली आहे. अभिजित यांची पंचायतराज व ग्रामविकास विभाग मोहोळ विधानसभा संयोजकपदी निवड केली आहे. या निवडीनंतर अभिजित यांची राखीव असलेल्या मोहोळ मतदारसंघासाठी चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारांचे (Sharad Pawar) एकनिष्ठ मानले जाणारे लक्ष्मण ढोबळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून भाजपवासी झाले. काही दिवस पक्षांतर्गत काम केल्यानंतर त्यांच्या गळ्यात प्रवक्तेपदाची माळ पडली. सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सोलापूर राखीव मतदारसंघातून सध्या भाजप नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे. या जागेसाठी भाजपकडून जवळपास डझनाहून अधिक नावे चर्चेत आहेत. यातच ढोबळेंची कन्या अॅड. कोमल ढोबळे-साळुंखे यांचेही नाव आघाडीवर आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Abhijeet Dhoble
Shakib Al Hasan : खासदार होताच शाकिबला मस्ती; चाहत्याच्या थेट कानाखालीच दिली! व्हिडीओ व्हायरल...

या परिस्थितीत अभिजित ढोबळे (Abhijeet Dhoble) यांना मोहोळ विधानसभेची जबाबदारी देण्यात आली. या तालुक्यातून माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी 2009 ते 2014 या काळात लोकप्रतिनिधी म्हणून काम केले आहे. शिवाय मंगळवेढा-मोहोळ या जुन्या मतदारसंघातून २० वर्षे त्यांनी काम पाहिले आहे. त्यामुळे मोहोळ मतदारसंघाची त्यांना इत्थंभूत माहिती आहे, तर अभिजित ढोबळेंना यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकीय कामाचा अनुभव आहे.

दरम्यान, सोलापूर लोकसभेसाठी निवडणूक जाहीर झालेली नाही. सध्या या राखीव जागेसाठी अनेक जण इच्छुक आहेत. लोकसभेसाठी पक्ष-संघटनेचे काम केल्यानंतर अभिजित ढोबळेंचा मोहोळमधून विधानसभेसाठी उमेदवारी मागू शकतात, अशी राजकीय चर्चा आहे. त्यादृष्टीनेच सध्या भाजपमध्ये कामकाज सुरू असल्याचे बोलले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Abhijeet Dhoble
Aslam Shaikh : मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अस्लम शेख यांचा पारा चढला; काय आहे कारण ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com