Pune News, 23 Feb : पुण्यात 19 फेब्रुवारीला शिवजंयतीच्या दिवशी गुंड गज्या मारणेच्या गुंडांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या कार्यालयातील कर्मचारी देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली होती. कोथरूड परिसरात शिवजंयतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकी दरम्यान दुचाकीवरून निघालेल्या चौघांनी देवेंद्र जोग यांना कट मारला होता.
यावरून दुचाकीस्वार आणि जोग यांच्यात किरकोळ वाद झाला. मात्र, या वादातूनच अमोल तापकीर, ओम तीर्थराम, किरण पडवळ आणि बाबू पवार यांनी शिवीगाळ करत देवेंद्र जोग यांना मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे (Pune) खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आक्रमक भूमिका घेतली.
त्यांनी तात्काळ पोलिस आयुक्तांना आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मोहोळ यांनी पुण्यात येताच देवेंद्र जोगच्या घरी सपत्नीक जाच त्यांची भेट घेत विचारपूस केली. तर आता याच घटनेवरून माजी आमदार आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली आहे. पेरले तेच उगवले, असं म्हणत त्यांनी मोहोळ यांना टोला लगावला आहे.
एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये धंगेकरांनी लिहिलं, "पेरले तेच उगवले, जेव्हा माझ्या सर्वसामान्य पुणेकरांना गुंडांच्या या टोळ्या त्रास देतात तेव्हा याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्या खासदारांनी स्वतःच्या ऑफिसमधील मुलाला मारहाण झाल्यानंतर मात्र अचानक आक्रमक भूमिका घेतली आहे.
पुण्यनगरीच्या कायदा व सुव्यवस्थेबद्दल खासदारांनी खरंतर आत्मपरीक्षण करायला हवं. या गुंडांच्या टोळ्या आपणच पोसलेल्या आहेत. आपणच निवडणुकीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना धमकवण्यापासून तर पैसे वाटप करण्यापर्यंत या टोळ्यांचा वापर केला.
आज याच गुंडांच्या टोळ्या माझ्या सर्वसामान्य पुणेकरांना सर्वत्र त्रास देत आहेत. फरक फक्त इतकाच आहे की, आज ते तुमच्या ऑफिसपर्यंत पोहचलेत म्हणून आपण जागे झालात." अशा शब्दात त्यांनी पुण्यातील गुन्हेगारीवरून पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.