
Pune News, 23 Feb : आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. महापालिका निवडणुकीच्या तयारीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने (Shivsena UBT) आघाडी घेतली असून पालिका निवडणुकीचे भवितव्य अधांतरी असतानाच आतापासूनच इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे.
तसंच या इच्छुकांकडून अर्ज भरून घेण्यात येत आहेत. या अर्जावर तुमच्यावर कोणत्या पोलीस चौकीत गुन्हा दाखल आहेत याबाबतची माहिती देखील घेतली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेला गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे.
ठाकरेंच्या सेनेतील शिलेदार पक्षाला जय महाराष्ट्र करत इतर महायुतीच्या (Mahayuti) पक्षांमध्ये प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पक्षातील गळती रोखून पक्षाची ताकद वाढवण्याच्या दृष्टीकोनातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
याचाच भाग म्हणून ठाकरे सेनेकडून पुणे (Pune) शहरात येणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. आतापर्यंत तब्बल 180 इच्छुकांनी ठाकरे सेनेकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या इच्छुकांकडून अर्ज भरून घेण्यात येत आहेत. यासाठी होय मी नगरसेवक होणारच हे कॅम्पेन राबविण्यात येत आहे.
या कॅम्पेन अंतर्गत भरून घेण्यात येणाऱ्या इच्छुकांच्या अर्जामध्ये बेसिक माहितीसह इच्छुकांनी यापूर्वी निवडणूक लढली आहे का? तसेच कोणत्या राजकीय पक्षाकडून लढले आहेत. कोणत्या साली लढली आहे आणि किती मतदान पडला आहे. याबाबतची माहिती लिहून घेण्यात येत आहे.
त्यासोबतच भविष्यात पक्षावरील आरोप टाळण्यासाठी ठाकरे गटाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत असून इच्छुक म्हणून अर्ज भरून घेतानाच गुन्हा दाखल आहे का? असेल तर कोणत्या स्वरूपाचा याची माहिती इच्छुकांना द्यावी लागणार आहे. गुन्हेगारी स्वरूपाचा उमेदवार टाळण्यासाठी ठाकरे गटाकडून खबरदारी घेण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.