
Pune News, 23 Feb : पुण्यातील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर हे सध्या एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शनिवारी त्यांनी गळ्यात भगवं उपरणं असलेलं ठेवलेलं व्हाट्सअप स्टेटस चर्चेत होतं.
त्यानंतर काही तासांतच शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी धंगेकरांच्या (Ravindra Dhangekar) मुलाचा वाढदिवस साजरा केल्याचं समोर आलं. याबाबतचे फोटो खुद्द उदय सामंत यांनी ट्विट केले आहेत. त्यामुळे आता धंगेकर आणि शिंदेंच्या शिवसेनेतील वाढती जवळीक यातून ते काहीतरी वेगळा निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे.
याच सर्व चर्चांवर धंगेकर यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. शिवाय यावेळी त्यांनी आपण काँग्रेसमध्ये जाणार नाही असं न सांगता जाताना सर्वांना सांगून जाईन असं सूचक वक्तव्य केलं आहे. उदय सामंतांनी साजरा केलेला मुलाचा वाढदिवस आणि 'व्हाट्सअप स्टेटस'च्या चर्चांवर रवींद्र धंगेकर प्रतिक्रिया दिली.
मी जाताना लपून जाणार नाही, तसंच कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, "माझे मागचे स्टेटस बघा मला चांगलं वाटलं की ते स्टेटस ठेवतो. यामध्ये कधीकधी सर्वसामान्य नागरिकांचे स्टेटसपण असतात." तसंच उदय सामंतांनी (Uday Samant) ऑफर दिल्याच्या चर्चांवर बोलताना ते म्हणाले, ते मित्र आहेत.
त्यांना वाटत असेल आपला मित्र जवळ पाहिजे. तसं कोणालाही वाटतं. कारण आपला स्वभाव चांगला आहे. मी लोकांशी बोलतो, लोकांसाठी काम करतो. तीस वर्ष लोकांसाठी काम करतोय लढलोय. त्यामुळे ऑफर देणं काही चुकीचं नाही. आमचे कार्यकर्तेच कालपासून धुमाकूळ घालत आहेत. फोटो व्हायरल करत आहेत. कार्यकर्त्यांची जी इच्छा असेल तसा निर्णय होईल.
मी जाताना लपून जाणार नाही आणि येताना लपून येणार नाही सर्वांशी बोलूनच मी निर्णय घेणार, असं धंगेकर यांनी स्पष्ट केलं. शिवाय येत्या दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहे. आज काँग्रेसमध्ये (Congress) असून मी उद्या पण तुम्हाला काँग्रेसमध्ये दिसेन. मात्र, लोकांच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा जाणून घ्यायच्या आहेत. सध्या सोशल मीडियावर जे सुरू आहे त्याबाबत त्यांना काय वाटतं हे जाणून घेणार असल्याचंही धंगेकर म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.