Ravindra Dhangekar Sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar Reaction on Budget : 'हे तर 'गाजर' बजेट, काँग्रेसच्या योजना चोरल्या'; आमदाराने केला मोठा दावा

Chaitanya Machale

Pune News : आगामी लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर केले. या बजेटमधून युवा, महिला यांना सरकारने मोठा दिलासा दिल्याचा दावा भाजप नेते करत आहेत. तर, विरोधकांकडून हे बजेट कसे फसवे आहे, याची आकडेवारी जाहीर केली जात आहे. यामध्ये आता काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी उडी घेत बजेटवर टीका केली आहे. (Ravindra Dhangekar Reaction on Budget)

हे नागरिकांची फसवणूक करणारे बजेट आहे. महागाईमध्ये सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत असताना त्याला साथ देण्याचे कोणतेही काम या बजेटमध्ये करण्यात आलेले नाही, ही मोठी दुर्दैवी बाब आहे. केवळ मोठमोठ्या घोषणा करण्यात 'गाजर' दाखवण्यात हे पटाईत आहे, अशी टीका काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केली आहे.

सर्वसामान्यांना या बजेटकडून खूप अपेक्षा होत्या. पण नागरिकांचा भ्रमनिरास करण्याचे काम केंद्र सरकारने केलेले आहे. काँग्रेस (Congress) सरकारची जिथे सत्ता आहे तिथे मोफत वीज दिली जाते. तीच योजना केंद्र सरकारने आज चोरली आणि आपल्या बजेटमधून जाहीर केली. आज सादर झालेले बजेट हे 'इलेक्शन बजेट' आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेले आहे. गेल्या 10 वर्षात लोकांसाठी या सरकारने काहीही केलेले नाही. केवळ मोठमोठ्या घोषणा करण्यात, गाजर दाखवण्यात हे 'गुजरात'वाले पटाईत आहेत. पण प्रत्यक्ष लोकांना ते काहीही देत नाहीत, असा टोला धंगेकर यांनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संपूर्ण देशात गेल्या दहा वर्षात महागाई गगनाला भिडली आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव दुप्पट, तिप्पट झाले आहेत. डाळीचे भाव आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता भाजप सरकारला वैतागली आहे. हे सरकार पुन्हा सत्तेत आले तर येणाऱ्या काही दिवसात पेट्रोल 200 रुपयांच्या पुढे आणि गॅस 2 हजारच्या पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. सर्वसामान्य माणसांच्या डोक्यावरचे छप्पर सरकारला काढायचे आहे का? असा प्रश्न या बजेटकडे पाहिल्यानंतर पडतो.

नागरिक धडा शिकवतील...

वाढत असलेल्या महागाईला आळा घालण्यासाठी कुठलीही तरतूद या सरकारने आजच्या बजेटमध्ये केलेली नाही. यामुळे सर्वसामान्य लोक या बजेटवर नाराज आहेत. ही नाराजी येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला-आम्हाला पहायला मिळेल, असा विश्वास देखील आमदार धंगेकर यांनी यावेळी व्यक्त केला. सर्वसामान्यांसाठी काहीही ठोस उपाययोजना न करणाऱ्या सरकारला येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत देशातील नागरिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा दावा देखील धंगेकर यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT