Suryakant Dalvi : सूर्यकांत दळवींनी उद्धव ठाकरेंना केला 'जय महाराष्ट्र'- पक्ष धोरणांवरही सोडलं टीकास्त्र!

Uddhav Thackeray Shivsena : '...तरी देखील मला पक्षानं कचऱ्याच्या टोपलीत टाकलं टाकलं.' अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.
Suryakant Dalvi
Suryakant DalviSarkarnama
Published on
Updated on

Suryakant Dalvi joined BJP : कोकणात उद्धव ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. गेली अनेक वर्ष आमदार राहिलेले सूर्यकांत दळवी यांनी गुरुवार भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश झाला. तर प्रवेश करताच दळवी यांनी आपल्या माजी नेतृत्वावर सडकून टीका केली. Konak Dapoli Uddhav Thackeray Faction Leader Suyryakant Dalvi Enters BJP

Suryakant Dalvi
BJP Politics : कल्याण-डोंबिवलीत भाजप नेत्यांचं चाललंय तरी काय?

दापोली विधानसभा मतदार संघातून 25 वर्ष आमदार असलेल्या सूर्यकांत दळवी यांनी भाजप (BJP) मध्ये प्रवेश केला. अनेक कार्यकर्त्यांसह त्यांनी कमळ हातात घेतलं. यामुळं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अजून एक खिंडार पडलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवेसेनेत बंड केल्यानंतर कोकणात उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा फटका बसला. आता त्यांना सूर्यकांत दळवींच्या जाण्यानं आणखी एक धक्का बसला आहे. पक्षप्रवेश करताना दळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टिप्पणी केली.

गेली 25 वर्ष मी शिवसेनेत (Shivsena) होतो. इतकी समाजसेवा केली; मात्र तरी देखील मला पक्षानं कचऱ्याच्या टोपलीत टाकलं टाकलं. अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. एक तर पक्षाच्या धोरणांमुळं विकास कामं होतं नव्हती आणि त्यात ठाकरेंचा पक्ष इंडिया आघाडीसोबत गेल्यामुळे आपण हा पक्ष सोडल्याचा दावा देखील दळवी यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपला शेतापर्यंत नेण्याचं काम करायचंय -

सूर्यकांत दळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश करत कोकणात (Konkan) भाजपचं बळ अधिक वाढवलं आहे. भाजपला कोकणात सूर्यकांत दळवी यांच्या माध्यमातून नवी संधी मिळण्याची शक्यता आहे. दापोली भागाचा विकास झाला पाहिजे आणि दापोली हे एक पर्यटन स्थळ करण्याची गरज आहे, म्हणून मी भाजपमध्ये आलो असल्याची भावना दळवी यांनी व्यक्त केली आहे. भाजप कोकणात बांधापर्यंत आलाय, मात्र तो अद्याप शेतापर्यंत पोहोचलेला नाही, भाजपला शेतापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडणं हे आता आमची जबाबदारी आहे, असेही दळवी म्हणाले.

"माझ्या पंचवीस वर्षाच्या कार्यकाळात दापोली मतदार संघातील अनेक महत्वाची कामे मार्गी लावण्यात मी यशस्वी झालो, असे असले तरी काळानुसार मतदार संघातील नागरिक यांच्या नवीन गरजा निर्माण होत असताना दापोली मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार, महिला यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, पर्यटन वाढीसाठी नवीन प्रकल्प आणणे, हर्णे, दाभोळ जेटीचा प्रश्न मार्गी लावणे, सागरी महामार्गाचे काम पूर्ण करणे, यासारखे धोरणात्मक अनेक विकासप्रकल्प मार्गी लागणे आवश्यक आहे. आणि अशी विकासकामे पूर्णत्वास न्यायची असतील तर केंद्र व राज्य सरकारच्या समन्वय असल्याशिवाय शक्य नाही,'' असे सांगून दळवी म्हणाले, ''गेल्या दहा वर्षात देशभरात होत असलेल्या विकासात्मक कामातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे."

Suryakant Dalvi
Sanjay Raut : ठाकरे गटाचा कल्याणवर डोळा? श्रीकांत शिंदेंना 'असा' देणार शह

'आपल्या दापोली मतदार संघाचा विकास केवळ राजकारणामुळे खंडीत झाला आहे, त्याला चालना मिळायची असेल तर केवळ विरोधाला विरोध न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या विकासात्मक योजनांचा प्रभावीपणे वापर करून मतदार संघाचा विकास करता येणे शक्य आहे असे मला वाटते,' असा उल्लेख त्यांनी आपल्या पक्ष सोडताना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com