Ravindra Dhangekar Sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar : 'निवडणुकासुद्धा हायजॅक केल्या जात आहेत'; रविंद्र धंगेकरांचा मोठा आरोप!

Ravindra Dhangekar on Election Commission : निवडणूक आयोगासह सर्व केंद्रीय यंत्रणा सरकारच्या ओझ्याखाली दबल्या गेल्या आहेत, असंही धंगेकर म्हणाले आहेत.

Sudesh Mitkar

Ravindra Dhangekar with Baba Adhav News : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुदतीत सरकार स्थापन झाले नाहीतर राष्ट्रपती राजवट लावली जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र मुदत उलटली तरी राष्ट्रपती राजवट लागू केली नाही. निवडणूक आयोगासह सर्व केंद्रीय यंत्रणा सरकारच्या ओझ्याखाली दबल्या गेल्या आहेत. निवडणुकासुद्धा हायजॅक केल्या जात आहेत, अशी टीका काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी केली.

ईव्हीएम विरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेष आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या आंदोलनाला शनिवारी रविंद्र धंगेकर यांनी भेट देवून पाठिंबा दर्शवला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

रविंद्र धंगेकर(Ravindra Dhangekar) म्हणाले, 'निवडणूक यंत्रणा हाताशी धरून लोकशाहीची झालेली चिरफाड संपूर्ण महाराष्ट्राने विधानसभा निवडणुकीत अनुभवली आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या सर्वांना संघर्षाचे आवाहन करत ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेष उपोषण सुरू केले आहे. उपोषण स्थळी त्यांची भेट घेवून यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. माझ्यासह संविधानावर श्रद्धा असलेला, लोकशाहीवर विश्वास असलेला प्रत्येक नागरिक या आंदोलनात सहभागी आहे.'

lतसेच ''गेल्या १० वर्षांत लोकशाहीला घातक वातावरण देशात निर्माण झाले आहे. हुकुमशाही लादली जात आहे. वैयक्तिक हल्ले, जातीयवादी आणि विषारी प्रचार केला जात आहे. जे ऐकत नाहीत त्यांना इडीच्या धमक्या दिल्या जात आहेत. वैभवशाली भारताची लोकशाही संपवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने लोकशाहीच्या बाजूने उभे राहणे आवश्यक आहे.'', असेही यावेळी रविंद्र धंगेकर यांनी सांगितले.

याशिवाय उपोषणस्थळी माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील(Jayant Patil) म्हणाले होते की, 26 तारखेच्या आत सरकार स्थापन होणं आवश्यक होतं. आणि 26 पर्यंत सरकार स्थापन झालं नसल्याने राष्ट्रपती राजवट लागणं आवश्यक होतं. मात्र सध्या सरकारमधील लोकांना वेगळा नियम लावत राष्ट्रपती राजवट लावलेली नाही. इथे सगळं सोयीप्रमाणे चाललं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT