Jayant Patil on EVM : ''बाबा आढाव यांचे उपोषण मागे, मात्र आता EVM ..'' ; जयंत पाटलांची घोषणा!

Jayant Patil on Mahayuti Goverment : '... त्यामुळे सत्तेतील लोक त्यांना वाटेल तेव्हा शपथविधी घेऊन सरकार स्थापन करतील.' असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Jayant Patil at Pune News : विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला असल्याचा आरोप करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी उपोषण सुरू केलं होतं. या उपोषणाला महाविकास आघाडीसह महायुतीच्या नेत्यांनी उपस्थिती लावली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बाबा आढाव यांनी आपले उपोषण मागे घेतले. त्यानंतर आता महाराष्ट्रभर ईव्हीएम विरोधात जन आंदोलन उभारणार असल्याचे जयंत पाटील यांनी जाहीर केला आहे.

उपोषणस्थळी माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील(Jayant Patil) म्हणाले, 26 तारखेच्या आत सरकार स्थापन होणं आवश्यक होतं. आणि 26 पर्यंत सरकार स्थापन झालं नसल्याने राष्ट्रपती राजवट लागणं आवश्यक होतं. मात्र सध्या सरकारमधील लोकांना वेगळा नियम लावत राष्ट्रपती राजवट लावलेली नाही. इथे सगळं सोयीप्रमाणे चाललं असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.

5 डिसेंबरला शपथविधी घेतो चार डिसेंबरला घेतो दोन डिसेंबरला असं सातत्याने तारखा सांगण्यात येत आहे. मात्र सरकारला शपथविधीसाठी मूर्त सापडत नाही अशी परिस्थिती आहे. सरकार स्थापन होणार असल्याने कोण नाराज आणि कोण नाराज नाही याचा याला महत्वच राहिलं नसल्याचे सांगत जयंत पाटील यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांना टोला लगावला.

Jayant Patil
Baba Adhav on Vinod Tawde News : तावडेंचा उल्लेख करत बाबा आढाव उद्धव ठाकरेंसमोरच म्हणाले, 'तो प्रांत राऊतांचा मी...'

सध्या विरोधात असलेल्यांना सर्व नियम लावायचे आणि त्यांच्या जवळचे असलेल्या सत्तेतील लोकांना नियम लावायचे नाही, असंच राज्यपालांकडून होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सत्तेतील लोक त्यांना वाटेल तेव्हा शपथविधी घेऊन सरकार स्थापन करतील. असं असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

याशिवाय जयंत पाटील म्हणाले, 'अनेक लोक आम्हाला येऊन सांगत आहेत, की जेवढे मतदान आम्ही केला आहे. तेवढं मतदान मतपेटीत दिसत नाही. याबाबतची अनेक उदाहरणे देण्यात आली आहे. त्यामुळे या गोष्टींचा विचार केल्यास लोकांचा ईव्हीएम वरती विश्वास नाही असं सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकारमध्ये लोकांनी EVM चा आग्रह न धरता बॅलेट पेपर वरती निवडणुका घ्याव्यात, असा निर्णय द्यावा.' असं जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil
Rajesh Kshirasagar on Hasan Mushrif : मुश्रीफांच्या सहकारातील भूमिकेवर क्षीरसागरांनी नाराजी व्यक्त करत दिला 'हा' इशारा, म्हणाले ...

याचबरोबर जयंत पाटील पुढे म्हणाले,'राज्यातील निवडून आलेल्या आणि पराभूत उमेदवारांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्या त्या विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी अथवा नागरिकांनी मतदानाविषयी तक्रार देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्यभरातून पक्षातील उमेदवारांकडून तक्रारी देण्यात आल्या आहेत. आता महाराष्ट्रभर ईव्हीएम विरोधात सर्वत्र जनआंदोलन उभारणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com