Narendra Modi Dhangekar Mohol .jpg Sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar News: जैन बोर्डिंगच्या जागेचा वाद 'दिल्ली दरबारी'; PM मोदींना पत्र पाठवत धंगेकरांची सर्वात मोठी घोषणा

Ravindra Dhangekar Letter To PM Modi: जैन होस्टेल बोर्डिंगच्या जागेबाबत पुण्यामध्ये सुरू असलेला वाद आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोर्टात पोहोचला आहे. शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी याबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र पाठवलं आहे.

Sudesh Mitkar

Pune News : जैन होस्टेल बोर्डिंगच्या जागेबाबत पुण्यामध्ये सुरू असलेला वाद आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोर्टात पोहोचला आहे. शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी याबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र पाठवलं आहे. तसेच त्याबरोबर 27 ऑक्टोबरपासून एका नव्या लढायची देखील घोषणा त्यांनी केली आहे.

त्याबाबत रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केली आहे. यामध्ये धंगेकर म्हणाले, तमाम पुणेकरांना मी एका गोष्टीची माहिती देऊ इच्छितो, आज आपल्या सर्वांच्या वतीने मी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा व प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी, यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.

तसेच 27 ऑक्टोबर 2025 पासून हा व्यवहार रद्द होईपर्यंत मी तमाम पुणेकरांसह जैन बोर्डींग येथे बेमुदत धरणे आंदोलनास बसत असल्याची घोषणा देखील धंगेकर यांनी केली आहे.

धंगेकर म्हणाले, आजपर्यंतच्या गेल्या अठरा दिवसांच्या संपूर्ण संघर्षात माझ्यासह अनेक लोकांनी, अनेकवेळा या गोष्टीचे प्रत्यक्ष प्रत्यक्ष पुरावे दिले की, व्यवहारातील सर्वच व्यक्ती व संस्था या खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या संबंधित आहेत. आज मी या पत्रामध्ये देखील आपल्या सर्वांच्या माहितीसाठी या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम देत आहेत.

जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होण्याबरोबरच समाजातील मंदिरे व देवस्थानच्या जागा हडप करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी या प्रकरणाची निपक्ष:पाती चौकशी होणे गरजेचे आहे. ही मी नि:पक्षपाती चौकशी तेव्हा शक्य आहे. जेव्हा सदर प्रकरणातील मुरलीधर मोहोळ हे आपल्या पदाचा राजीनामा देतील.

कारण त्यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या प्रभावाखालीच हा इतका मोठा गैरव्यवहार घडला आहे. त्यामुळे ही चौकशी होत असताना देखील त्यांनी मंत्रिपदावर राहणे योग्य नाही. त्यामुळे मी आज मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.

पंतप्रधानांसह, देशाचे गृह तथा सहकारमंत्री, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांना देखील आपण या पत्राच्या प्रती पाठवत असल्याचं माजी आमदार आणि शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून तातडीने हा व्यवहार आपल्या विशेष अधिकारातून रद्द करावा व या प्रकरणाची कठोर चौकशी होईपर्यंत मुरलीधर मोहोळ यांचा राज्यमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा ,अशी मागणी करत असल्याचेही धंगेकरांनी यावेळी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT